Devendra Fadanvis | विधानसभा निवडणुकांचा निकाल लागून 5 दिवस उलटून गेले असले तरी महायुतीकडून अजूनही सत्ता स्थापन झाली नाही. महायुतीच्या बैठकांचे सत्र मात्र सुरूच आहे. या दरम्यान काळजीवाहू सरकार असताना वक्फ बोर्डाला 10 कोटी रुपये निधी देण्याचा निर्णय घेत त्यासंबंधी एक जीआर काढण्यात आला होता. परंतु प्रशासनाच्या या भूमिकेमुळे देवेंद्र फडणवीस यांनी नाराजी व्यक्त केली असून तो जीआर मुख्य सचिवांनी माघारी घेतल्याचे आता स्पष्ट केले आहे.
Devendra Fadanvis | ‘मुख्यमंत्री पदाबाबत लवकरच उत्तर मिळेल’!; देवेंद्र फडणवीसांचे सुचक विधान
काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
“प्रशासनाने राज्यात काळजीवाहू सरकार असताना ही वक्फ बोर्डाला निधी देण्याबाबत जीआर काढणे योग्य नाही. त्यामुळे मुख्य सचिवांकडून तात्काळ तो आदेश मागे घेण्यात आला आहे. राज्यात नवीन सरकार आल्यावर, योग्य अवचित्य व नियमाधीनता साधत याबाबत चौकशी केली जाईल.” असे म्हटले आहे.
नेमकं प्रकरण काय?
वेगळ्या पायाभूत सुविधांसाठी राज्य सरकारकडून राज्य वक्फ बोर्डाला 10 कोटी रुपयांचा निधी जाहीर करण्यात आला होता. तसा जीआर देखील प्रशासनाने काढला होता. अल्पसंख्यांक विभागाने याबाबत शासन निर्णय जारी केला असून शासन निर्णयानुसार, 2024-25 वर्षांमध्ये अर्थसंकल्पीय अंदाज व पुरवणी मागणीद्वारे 19 कोटी एवढी तरतूद करण्यात आली होती. त्यातून 2 कोटी अनुदान वक्फ बोर्डाला वितरित करण्यात आले. असून आता 10 कोटी रुपये अदा करण्यात आले होते.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम