Devendra Fadanvis | नानांवर ‘बिनपगारी फुल्ल अधिकारी’ म्हणत टिका अन् दादांना मंत्रीपद; फडणवीसांनी केलं जाहीर

0
125
#image_title

Devendra Fadanvis | देवळा-चांदवड विधानसभा मतदारसंघात रंगतदार लढत पाहायला मिळणार असून उमेदवारी जाहीर झाल्यापासून घडलेले राजकीय नाट्य व त्यामुळे बदललेली राजकीय समीकरणे याचा निवडणुकीवर काय परिणाम होतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. आज चांदवड-देवळा विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार राहुल आहेर यांच्या प्रचारार्थ चांदवड येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी त्यांनी उमेदवारीवरून झालेल्या राजकीय नाट्याची तिसरी बाजू स्पष्ट केली.

Devendra Fadanvis | ‘मविआ मुस्लिमांचे पोलरायझेशन करून निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न करतेय’; फडणवीसांचा घणाघात

यावेळी बोलताना “चांदवड-देवळ्यात तिकीट देताना मलाही खूप उलट पुलट करावं लागलं. राहुल दादांना तिकीट द्यायचं फायनल केलं. कारण सर्व सर्व्हे सांगत होते की, राहुल दादाच निवडून येऊ शकतात. पण हे महाराज अचानक रणांगणातल्या कृष्णासारखे झाले आणि हत्यार खाली ठेऊन समोर तर माझे हे सगळे आप्त आहेत. त्यांच्याशी कसं लढू, असे मत मांडत माझ्याकडे आले आणि म्हणे तुम्ही केदा नानाला तिकीट द्या. आमचा परिवार तुटेल. त्यापेक्षा त्याची इच्छा आहे, तर त्याला तिकीट द्या. त्यामुळे यांच्या आग्रहास्तव मी दिल्लीला फोन केला आणि त्यांना तिकीट द्यायला सांगितले. पण त्यानंतर चांदवड देवळ्याच्या जनतेने जो माझ्यावर हल्ला केला. ऐकायलाच तयार नाही. मी त्यांना म्हटलो राहुल दादा नाही म्हणताय. ते म्हणे राहुल दादा कोण होतात. आमचा आमदार कोण होणार हे आम्ही ठरवणार.”

‘एक बार मैने तय कर लिया, तो मै खुदकी भी नही सुनता’; फडणवीसांची डायलॉगबाजी 

“हा जनरेटा मी पाहिला आणि मीही ठरवलं राहुल दादांनाच उमेदवारी द्यायची आणि राहुल दादांना म्हंटलं “एक बार मैने तय कर लिया, तो मै खुदकी भी नही सुनता” आता तुम्ही शांत बसा. चांदवड-देवळा मतदारसंघातून भाजपचा उमेदवार हा डॉ. राहुल आहेरच असेल आणि त्याची घोषणा केली. ही निवडणूक जनतेने हातात घेतलीय आणि आता कोणी चंद्रावरून जरी खाली उतरलं. तरी हा निकाल नाही बदलू शकत.”

Devendra Fadnavis | दादांना आमचा गुण लागलाय, युतीचा चेहरा कोण..?; फडणवीसांचं मोठं वक्तव्य

देवळ्यामध्ये जे बिनपगारी फुल्ल अधिकारी नेमले होते…  

“पण राहुल दादा आता तुमच्या लक्षात आलं असेल. तुम्ही देवळ्यामध्ये हे बिनपगारी फुल्ल अधिकारी नेमले होते, असे करू नका. आपले चांगले नेते, कार्यकर्ते, पदाधिकारी यांनाच अधिकार द्या. मी आता जरी त्यांना बिनपगारी म्हंटलो असलो तरी त्यांचा पगार काय होता. हे मला सांगायची गरज नाही.” असे म्हणत केदा आहेर  यांच्यावर जोरदार निशाणा साधला.

तुम्ही मला आमदार निवडून द्या. मी तुम्हाला पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात कॅबिनेट मंत्री पाठवतो

तसेच, “2019 ला आलो होतो. तेव्हा तुम्हाला एक शब्द दिला होता. पण माझी बैमानी झाली. माझं सरकारच आलं नाही. मग जेव्हा आलं तेव्हा असं आलं की, आम्हाला एक्सपान्शन करायला स्कोप मिळाला नव्हता. आम्ही 25 पद रिकमी ठेवली. पण आज मी तुम्हाला छातीठोकपणे सांगून जातोय. तुम्ही मला राहुल आहेरांच्या रूपाने आमदार द्या. पहिल्याच एक्सपांशनमध्ये कॅबिनेट मंत्री परत पाठवतो. असं म्हणत आश्वासन दिलं आहे. तसंच अट घालत, “वीस हजाराच्या आतील लीड असेल तर राज्यमंत्री आणि 20 हजाराच्या वर लीड असेल तर कॅबिनेट मंत्री” असं म्हणत जनतेला आश्वस्त केलं आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here