Devendra Fadanvis | राज्यामध्ये नुकत्याच विधानसभा निवडणुका पार पडल्या असून महायुती सरकारमध्ये सत्ता स्थापनेच्या घडामोडींना वेग आला आहे. अशातच, “तीन्ही पक्षाचे नेते मिळून मुख्यमंत्री पदासंदर्भात निर्णय घेतील. वरिष्ठांची चर्चा सुरू आहे. त्यामुळे लवकरच उत्तर मिळेल.” अशी माहिती राज्याचे माजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे. तसेच “आधी मुख्यमंत्री ठरेल व त्यानंतर इतर मंत्री ठरतील. मुख्यमंत्रीपदानंतर इतर मंत्र्यांची नावे जाहीर होतील.” असे देखील त्यांनी यावेळी सांगितले आहे.
तसेच विरोधकांकडून करण्यात आलेल्या ईव्हीएममध्ये गडबड असल्याच्या आरोपांबाबत बोलताना फडणवीस यांनी “काल सर्वोच्च न्यायालयाने ईव्हीएमबाबत सुरू असलेल्या चर्चेवर उत्तर दिले आहे.” असे म्हटले.
सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले?
काल सर्वोच्च न्यायालयात ईव्हीएमबाबत सुनावणी पार पडली असून सर्वोच्च न्यायालयाने, “तुम्ही हरले तर ईव्हीएम वाईट ही पद्धत बंद करा. ईव्हीएम टेम्परप्रूफ आहे. ईव्हीएमची पद्धत सुरूच राहणार असून विरोधी पक्षांनी रवीचा डाव बंद केला पाहिजे. स्थानिक स्वराज्य संस्था स्वबळावर लढवायचं की नाही. हे आम्ही ठेरवू.” असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम