BJP Political | विधानसभा निवडणूक अवघ्या आठ दिवसांवर येऊन ठेपली असून सत्ताधारी आणि विरोधकांच्या उमेदवारांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरू असून वादग्रस्त विधानांनी युती आणि आघाडी दोघांचीही झोप उडवली आहे. अशातच महायुतीतील सुजय विखे, बबन लोणीकर, धनंजय महाडिक, संजय गायकवाड, नितेश राणे यांच्यासह अनेक मंडळींनी प्रचारसभेत वादग्रस्त विधानांनी ऐन निवडणुकांच्या तोंडावर भाजपच्या अडचणीत भर घातली आहे. अशातच महायुतीच्या आमदाराची जीभ घसरली आहे.
BJP Political | भाजपकडून बंडखोरांची हकालपट्टी; पक्ष शिस्तीचा भंग केल्याप्रकरणी केली कारवाई
विधानपरिषद आमदार पंकजा मुंडे यांच्या समोरच वादग्रस्त विधान
सध्या मराठवाड्यात ‘जरांगे फॅक्टर’मुळे महायुती चिंतेत होती. त्यातच आता भाजपची मतदानाच्या तोंडावर पुन्हा एकदा कोंडी होण्याची चिन्हे असून नांदेड जिल्ह्यातील किनवट विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे विद्यमान आमदार भीमराव केराम यांनी विधानपरिषद आमदार पंकजा मुंडे यांच्या समोरच वादग्रस्त विधान केले आहे. ज्यामुळे आता विरोधकांना टीका करण्यासाठी सणसणीत मुद्दा सापडला आहे.
“भाजपाचे हे आमदार गावात फिरकले नाहीत”
सोमवार दिनांक 11 नोव्हेंबर रोजी बोधडी येथे प्रचार सभेत बोलताना भाजपचे आमदार भीमराव केराम यांनी, “रोज रोज गावात येऊन तुमचे काय मुके घ्यायचे?” या वक्तव्यामुळे राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. “भाजपाचे हे आमदार गावात फिरकले नाहीत.” अशी टीका सुरू झाली असून या टीकेला प्रत्युत्तर देत आमदार भीमराव केराम यांची जीभ घसरली आहे.
नेमकं काय म्हणाले भीमराव केराम?
नांदेड जिल्हाबरोबर मराठवाड्यात महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात अटीतटीची सामना होणार असून किनवट मतदार संघात देखील भाजपचे भीमराव विरुद्ध राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून प्रदीप नाईक अशी लढत पाहायला मिळण्याची शक्यता आहे. त्यातच, “दररोज गावात येऊन काय तुमचे मुके घ्यायचे? मंत्रालयात वेळ देऊन गावासाठी निधी आणायचं काम आपण करतो.” असे केराम यांनी आपल्या भाषणात म्हटले आहे. ज्यामुळे आता निवडणुकीच्या तोंडावर भाजपाची डोकेदुखी वाढणार आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम