BJP Politics | निवडणुकीपूर्वीच भाजपला नंदुरबार मधून फटका; माजी खासदार डॉ. हिना गावितांचा भाजपला रामराम

0
61
#image_title

BJP Politics | विधानसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली असतानाच भाजपला नंदुरबारमध्ये मोठा धक्का बसला आहे. भाजपाच्या माजी खासदार डॉ. हिना गावित यांनी भाजपाला राम राम ठोकला आहे. अपक्ष उमेदवार म्हणून लढत असल्यामुळे पक्षाला अडचण होऊ नये, म्हणून राजीनामा देते असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

BJP Politics | भाजपची दुसरी यादी जाहीर; नाशिक मध्यचा तिढा सुटला!

निवडणुकांपूर्वीच भाजपला नंदुरबारमध्ये फटका

डॉ. हीना गावित अक्कलकुवा आक्रनी मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवत असून अक्कलकुवा मतदारसंघ भाजपला सुटावा याकरिता त्यांनी आग्रह धरला होता. “नंदुरबार मतदारसंघात शिंदे गटा विरोधात काम करत आहे. त्यामुळे मी अक्कलकुवा मतदारसंघात अपक्ष उमेदवार म्हणून लढत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. मी खासदार असताना अक्कलकुवा मतदारसंघात अनेक विकासाची कामे केली आहेत. मी केलेल्या विकास कामांचा फायदा मला मतदानाच्या रूपात होणार असून मी निवडणूक लढवून जिंकणार आहे”. असे देखील त्यांनी यावेळी सांगितले.

अपक्ष उमेदवारी करत असल्यामुळे दिला राजीनामा

तसेच, “शिंदे गट भाजपच्या विरोधात काम करत आहे, त्यामुळे मी शिंदे गटा विरोधात उमेदवारी करत आहे.” असे देखील हिना गावित यांनी स्पष्ट केले. हिना गावित यांनी भाजपला रामराम ठोकल्याने विधानसभा निवडणुकीत पूर्वीच भाजपला नंदुरबार मध्ये मोठा फटका बसला आहे.

BJP NCP Politics: ‘शरद पवारांना भाजपसोबत युती हवी होती, मात्र फडणवीस मुख्यमंत्री….’ भाजप नेत्याच्या दाव्याने खळबळ

कोण आहेत डॉ. हिना गाविगावित? 

हिना गावित या डॉ. विजयकुमार गावित यांच्या कन्या असून त्या पेशाने डॉक्टर आहेत. त्यांनी एमबीबीएस व एमडी ही पदवी घेतली असून हिना गावित या 2014 साली लोकसभेवर पहिल्यांदा निवडून आल्या होत्या. त्या लोकसभेवर निवडून केलेल्या सर्वाधिक तरुण खासदार देखील ठरल्या होत्या. यावेळी हिना गावित या 26 वर्षांच्या होत्या. त्यांनी पहिल्या टर्ममध्ये आपल्या कामगिरीने छाप पाडली होती. पंतप्रधान मोदी यांनीही त्यांचे कौतुक केले होते. 2019 मध्ये ही विना गावित लोकसभा निवडणूक आल्या होत्या.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here