Dada Bhuse | मालेगाव बाह्य मतदार संघातून शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून माजी मंत्री प्रशांत हिरे यांचे चिरंजीव अद्वय हिरे यांना उमेदवारी जाहीर झाली असून, 24 तारखेला त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी आयोजित जाहीर सभेत बोलताना त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्री दादा भुसे यांच्या वडिलांचा उल्लेख करत त्यांचे कर्तुत्व काढत व एकेरी उल्लेख करत पातळी सोडून टिका केली. यावरून महायुतीचे कार्यकर्ते आणि भुसे समर्थकांमध्ये एकच संतापाची लाट उसळली असून, वारकरी संप्रदाय आयोजित कार्यक्रमात बोलताना हिरेंच्या या विधानाचा आज मंत्री दादाजी भुसे यांनी समाचार घेतला.
Dada Bhuse | निवडणुकीच्या तोंडावर युतीत बिनसलं; व्हायरल व्हिडिओने पालकमंत्र्यांच्या चिंतेत वाढ
“वाचाळवीरांनी माझ्या वडिलांचा अपमान केला”
“काही वाचाळ वीरांनी माझ्या वडिलांचा अपमान केला. 1946 मध्ये स्वतंत्र भारताच्या उठावात माझे वडील सहभागी होते. 1946 मध्ये मालेगावातील विचार सभेवर इंग्रजांनी गोळीबार केला. त्यात माझ्या वडिलांच्या पोटात गोळी अडकली. त्यावेळी धुळ्यातील शासकीय रुग्णालयात वडिलांना नेण्यात आले आणि तेथे ऑपरेशन केल्यानंतर सहा महिने ते त्याठिकाणी ऍडमिट होते. माझे वडील हे एक स्वातंत्र्य सैनिक होते आणि या वाचाळ वीरांनी त्यांचा अपमान केला आहे. मी मालेगाव तालुक्याची परवानगी मागत असून, 28 तारखेच्या सभेत मी याविषयी बोलणार आहे. कुणी काय बोलावे ही ज्याची त्याची संस्कृती आहे. पण कोणाच्याही बापजाद्यापर्यंत जायला नको. ही आपली संस्कृती आपण जपली पाहिजे.”
पाठीशी जनतेचा आशीर्वाद असताना मला बॉडीगार्डची गरज नाही
यावेळी बोलताना “मी कधीही मंत्री म्हणून वागलो नसून नेहमी शिपायाप्रमाणे काम केले आहे. कधी कुठल्या तामझामात पडलो नाही. ना ताफा ना कधी बॉडीगार्ड घेतला. माझ्या पाठीशी माझ्या जनतेचा एवढा आशीर्वाद असताना मला बॉडीगार्डची गरजच नाही.” आतापर्यंत मालेगाव तालुक्यातअनेक अभिमानास्पद कामं झाली आहेत. यापुढेही मालेगाव जिल्हा होण्यासाठी प्रयत्नशील राहणार असून रोजगारावर देखील आपण विशेष लक्ष देणार असल्याचे मंत्री भुसे म्हणाले.
Dada Bhuse | ‘या’ तारखेपर्यंत लाडकी बहिणीचे अर्ज भरता येणार; दादा भुसेंचे महिलांना आवाहन
उमेदवारी अर्ज भरण्याकरिता मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन
तसेच “मी कायम आपल्या सुखदुःखात उभा आहे. काही लोक आता निवडणुका आल्या म्हणून दारावर जायला लागले आहेत. अशी नौटंकी मी कधीही केली नाही. मी रात्रीचे व्हॉटसअप चालवत नाही. पण रात्री पहाटे कधीही कॉल घेवू शकतो. 24 तास दादा भुसे शुध्दीवर असतो”, असे आश्वासित करत 28 ऑक्टोबर रोजी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन यावेळी मंत्री भुसे यांनी केले.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम