Nashik Politics | नाशकात उमेदवारी अर्ज भरण्याकरीता इच्छुकांची गर्दी; दिंडोरी मतदारसंघात सर्वाधिक इच्छूक

0
30
#image_title

Nashik Politics | विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला असून काल उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासह जिल्हाभरातील 15 विधानसभा मतदारसंघात इच्छुकांनी गर्दी केली होती. कालपर्यंत 45 इच्छुकांकडून 57 अर्ज दाखल करण्यात आले आहेत. काल एकाच दिवसात आमदार अनिल कदम यांच्या पत्नी वैशाली कदम, आमदार हिरामण खोसकर यांच्यासह 18 उमेदवारांनी 20 अर्ज दाखल केले आहेत.

Nashik Politics | नांदगावात महायुतीला फटका; समीर भुजबळ अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार

दिंडोरी मतदारसंघातून काल सर्वाधिक अर्ज दाखल 

छगन भुजबळ यांनी हिरामण खोसकरांचा अर्ज दाखल करण्याकरीता जिल्हाधिकारी कार्यालयात हजेरी लावली होती. विधानसभा निवडणुकीत उमेदवारी दाखल करणाऱ्या इच्छुकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. कालच्या दिवसात उमेदवारी दाखल करणाऱ्यांमध्ये सर्वाधिक इच्छुक हे दिंडोरी मतदारसंघातून होते. तर दिंडोरी मतदारसंघातून काल 11 अर्ज दाखल झाले असून त्यामध्ये शरद पवार गटाचे भास्कर गावित यांचा समावेश आहे.

नाशिक पश्चिम मधून निर्भय महाराष्ट्र पार्टीच्या सतीश आस्वारी यांनी भरला अर्ज

Nashik Politics | नाशिक मध्य मतदारसंघाचा तिढा सुटेना; देवयानी फरांदेंच्या अडचणींत वाढ!

मालेगाव बाह्य मतदारसंघात एमआयएमच्या ऐतेजाद तडवी यांच्यासह 8 जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले असून निफाड मतदारसंघातून प्रहार जनशक्ती तर्फे गुरुदेव कांदे, काँग्रेसकडून महेश आव्हाड, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वैशाली अनिल कदम यांच्यासह 7 जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. नाशिक पश्चिम मधून निर्भय महाराष्ट्र पार्टीच्या सतीश आस्वारी यांच्यासह 6 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. तर सिन्नर मधून 5 येवला कळवण येथे 4-4 अर्ज दाखल झाले असून नांदगाव येथून 3 अर्ज दाखल झाले आहेत. नाशिक पूर्व मधून जितेंद्र भाभे यांच्यासह 2 अर्ज दाखल झाले आहेत. तर इगतपुरी मधून हिरामण खोसकर व अनिता घारे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. चांदवड मधून 2 अर्ज दाखल झाले असून देवळाली मधून अविनाश शिंदे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. बागलाण नाशिक मध्य मधून 1-1 अर्ज दाखल झाले आहेत.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here