Deola | केदा आहेरांची उमेदवारी नाकारणे भाजपला पडले महागात; देवळ्यात भाजपला मोठे खिंडार

0
13
#image_title

Deola | चांदवड-देवळा मतदार संघात भाजपच्या अडचणी वाढणार असून पदाधिकाऱ्यांनी पक्षाविरोधात राजीनामा अस्त्र उगारले आहे.रविवार 20 ऑक्टोबर रोजी भाजपकडून पहिल्या 99 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली. या यादीमध्ये नाशिकच्या चांदवड-देवळा मतदारसंघातून विद्यमान आमदार डॉ. राहुल आहेर यांचे नाव जाहीर झाले.

Chandwad-Deola | घात झाला घात..!; दाखवून त्यागाचा लळा केसानेच कापला गळा..?

यावरून आता राजकारण पेटायला सुरुवात झाली असून देवळा-चांदवड मतदार संघातील भाजपच्या नगरपंचायतीच्या नगराध्यक्षांसह 17 नगरसेवकांनी राजीनामे दिल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये भाजपच्या जिल्हा उपाध्यक्ष किशोर चव्हाण यांचा देखील समावेश असून त्यांनी देखील आपल्या जिल्हा उपाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे.

Deola | केदा आहेरांना उमेदवारी न मिळाल्याने भाजपच्या जिल्हा उपाध्यक्षांनी दिला राजीनामा

पक्षाच्या निर्णयावर रोष

भाजपकडून केदा आहेर यांना उमेदवारी नाकारल्याने पदाधिकाऱ्यांनी पक्षाच्या निर्णयावर रोष व्यक्त करत राजीनामे दिल्याची माहिती असून, भाजपकडून घेण्यात आलेल्या या निर्णयाने चांदवड-देवळा मतदारसंघातून नाराजी व्यक्त केली जात आहे. यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपाला खिंडार पडणार असल्याचे चित्र आहे.

या नगरसेवकांनी दिले राजीनामे

नगराध्यक्ष – भाग्यश्री अतुल पवार

उपनगराध्यक्ष – मनोज राजाराम आहेर

गटनेता – संजय तानाजी आहेर

नगरसेवक – जितेंद्र रमन आहेर

नगरसेवक – भूषण बाळू गांगुर्डे

नगरसेवक – कैलास जीभाऊ पवार

नगरसेवक – करण शरद आहेर

नगरसेवक – अशोक संतोष आहेर

नगरसेविका – सुलभा जितेंद्र आहेर

नगरसेविका – भारती अशोक आहेर

नगरसेविका – सुनंदा साहेबराव आहेर

नगरसेविका – अश्विनी सागर चौधरी

नगरसेविका – रत्ना ललित मेतकर

नगरसेविका – राखी रोशन बिलोरे

नगरसेविका – शीला दिलीप आहेर

नगरसेवक – योगेश दिनकर आहेर

नगरसेवक – हितेश प्रकाश आहेर


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here