Deola | केदा आहेरांना उमेदवारी न मिळाल्याने भाजपच्या जिल्हा उपाध्यक्षांनी दिला राजीनामा

0
53
#image_title

सोमनाथ जगताप- प्रतिनिधी: देवळा | देवळा येथील केदा आहेरांना चांदवड-देवळा विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी न मिळाल्याने भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष किशोर चव्हाण यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. केदा आहेर यांना उमेदवारी न मिळाल्याने पक्षाच्या स्थानिक पातळीवर मोठी अस्वस्थता पसरली असून, कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. यामुळे आहेर समर्थक अनेक पदाधिकाऱ्यांनी राजीनाम्याची तयारी दर्शवली आहे.

Deola | चांदवड-देवळा मतदारसंघात ‘नाना की दादा ‘ आज मुंबईत फैसला

जिल्हा उपाध्यक्ष किशोर चव्हाणांनी दिला राजीनामा

उमेदवारीसाठी भाजपच्या वतीने केदा आहेर यांचे नाव प्रमुख दावेदारांमध्ये होते. अनेक वर्षे पक्षासाठी निष्ठेने काम करणारे, तसेच स्थानिक पातळीवर सक्रिय असलेल्या या नेत्याने मतदारसंघात आपली छाप उमटविली आहे. त्यामुळे उमेदवारीची अपेक्षा ठेवली जात होती. मात्र, पक्षाने त्याऐवजी पुन्हा डॉ. राहुल आहेरांना संधी दिल्याने अस्वस्थ होऊन जिल्हा उपाध्यक्ष किशोर चव्हाण यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. यामुळे तालुक्यात राजकिय घडामोडींनी वेग घेतला आहे.

Deola | चांदवड-देवळ्याच्या राजकारणाला रंजक वळण; राहुल आहेर उमेदवारी मागे घेण्यावर ठाम

काय म्हटले आहे राजीनामा पत्रात? 

चव्हाण यांनी आपल्या राजीनामा पत्रात म्हटले आहे की, देवळा तालुक्यात सर्वत्र राजकीय अस्थिरतेचे वातावरण असून, उमेदवारी संदर्भात पक्षाच्या वारंवार बदलणाऱ्या भूमिकेमुळे कार्यकर्ते अस्वस्थ व संभ्रमात सापडले आहेत. अशा अस्थिर वातावरणात पदाधिकारी म्हणून काम करणे अवघड असल्याचे सांगत राजीनामा जिल्हाध्यक्षांकडे दिला असून तो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या उमेदवारी वरून कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली आहे. काही कार्यकर्त्यांनी त्यांच्या समर्थनार्थ पक्षाच्या निर्णयाविरोधात आवाज उठवण्यास सुरुवात केली आहे. पक्षाचे वरिष्ठ नेते या प्रकरणावर काय प्रतिक्रिया देतात आणि मतदार संघातील कार्यकर्त्यांचा पवित्रा काय राहतो, याकडे सध्या सर्वांचे लक्ष लागले आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here