Chandwad-Deola | घात झाला घात..!; दाखवून त्यागाचा लळा केसानेच कापला गळा..?

0
167
#image_title

Chandwad-Deola | लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजू लागले. “अबकी बार ४०० पार” हा नारा देणारी सत्ताधारी भारतीय जनता पार्टी लोकसभेत काठावर पास झाली. त्यात महाराष्ट्रात तर भाजपला मोठा फटका बसला. सध्या राज्यात विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर झाली असून रविवारी 20 ऑक्टोबर रोजी 99 उमेदवारांची पहिली यादी भाजपने जाहीर केली. या यादीत नाशिकच्या चांदवड-देवळा मतदारसंघातून विद्यमान आमदार डॉ. राहुल आहेत यांचे नाव जाहीर झाले आणि चांदवड-देवळा मतदार संघातील राजकीय समीकरणाला सुरुंग लागला.

Keda Aaher | केदा आहेर बंडखोरी करणार…?; एल्गार मेळाव्यातून निवडणुकीच रणशिंग फुंकणार!

वारस आणि पुत्रप्रेम ठरले मेहनतीच्या वरचढ

भाजपचे माजी मंत्री जेष्ठ नेते स्व. डॉ. दौलतराव आहेर यांचे सुपुत्र डॉ. राहुल आहेर मागील १० वर्ष म्हणजेच २ टर्म चांदवड-देवळा मतदारसंघातून निवडून आले आहेत. परंतु यंदाच्या निवडणुकीत त्यांच्यासोबत भाजपासाठी मागील 25 वर्षांपासून दिवस रात्र झटलेले त्यांचे बंधू केदा आहेर हे देखील उमेदवारीच्या शर्यतीत होते. केदा आहेरांनी सुरुवातीपासूनच दौलतराव आहेर यांसोबत सोबत काम केल्याने त्यांच्या पश्चात केदा आहेरांनाच लोक उमेदवारीचा खरा दावेदार मानू लागले.

परंतु वारस आणि पुत्रप्रेम मेहनतीच्या वरचढ ठरले. अन् 2014 ला कुणाच्याही परिचयात नसलेले राहुल आहेर उमेदवारीचे दावेदार ठरले. यावेळी “केदा आहेर हेच उमेदवार आहेत, असे समजून मत द्या” असे आवाहन करत केदा आहेरांनी बंधू राहुल आहेर यांना मागील दोन टर्म आमदार म्हणून खुर्चीवर बसवले. परंतु या निवडणुकीला केदा आहेरांना उमेदवारीची संधी हवी असताना कुटुंबवात्सल्यतेचा आव आणत राहुल आहेरांनी उमेदवारीचा त्याग केल्याचे घोषित केले. परंतु यादी समोर येताच आपल्यासोबत घात झाल्याची भावना केदा आहेरांनी बोलून दाखवली आहे.

Deola | केदा आहेरांना उमेदवारी न मिळाल्याने भाजपच्या जिल्हा उपाध्यक्षांनी दिला राजीनामा

त्यागाचा लळा दाखवत केसाने गळा कापला…. 

तर “त्यागाचा लळा दाखवत भावानेच, भावाचा केसाने गळा कापल्याचे” म्हणत केदा आहेरांच्या समर्थकांकडून रोष व्यक्त केला जात आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत चांदवड-देवळा मतदारसंघातून व्यक्त होत असलेला हा रोष भाजपाला महागात पडणार असल्याची शक्यता असून “नाना विरुद्ध दादा” असा सामना झाल्यास मतांची विभागणी होऊन दोघांच्या भांडणात तिसऱ्याला लाभ होण्याची दाट शक्यता आहे. तर आज संध्याकाळी ६ वाजता केदा आहेरांनी एल्गार मेळाव्याची घोषणा केली असून या एल्गार मेळाव्यात त्यांची पुढील भूमिका स्पष्ट होण्याचे संकेत आहेत.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here