Nashik Political | देवळाली मतदारसंघात शिंदे गटाला खिंडार; ‘या’ नेत्याने केला पक्षप्रवेश निश्चित

0
13
Eknath Shinde
Eknath Shinde

Nashik Political | नाशिकमध्ये शिंदे सेनेला निवडणुकीपूर्वीच धक्का बसला असून, माजी मंत्री बबनराव घोलप हे लवकरच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रवेशामुळे देवळाली मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाला खिंडार पडणार आहे. बबनराव घोलप देवळाली मतदारसंघातून शिवसेनेच्या तिकिटावर 5 वेळा निवडून आले आहेत. तर त्यांचे पुत्र योगेश घोलप हे देखील एक वेळा निवडून आले आहेत.

Nashik Political | नाशकात शिंदे सेनेची कोंडी; विधानसभेसाठी फक्त दोनच जागा मिळणार?

आठ महिन्यांपूर्वीच केला होता शिंदे गटात प्रवेश

आठ महिन्यांपूर्वी बबनराव घोलप यांनी शिवसेना ठाकरे कट्टाला सोडचिठ्ठी देत लोकसभा निवडणुकीपूर्वी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला होता. लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी महायुतीचा प्रचार देखील केला होता. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून बबनराव घोलप यांना शिंदे गटाकडूनही डावलले जात असल्याचे चित्र आहे. त्यातच विधानसभा निवडणुकीत देवळाली मतदारसंघाची जागा महायुतीमध्ये पुन्हा अजित पवार गटाला मिळणार असल्याने घोलप नाराज असल्याची चर्चा होती.

तर, महाविकास आघाडीमध्ये देवळाली मतदारसंघाची जागा ही शिवसेना ठाकरे गटाला न मिळता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्या पक्षाला मिळणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारगपक्षाकडून तब्बल 20 उमेदवार तिकीट मिळवण्यासाठी स्पर्धेत असून देखील अद्याप राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून उमेदवार निश्चित केला गेलेला नाही. त्यामुळे बबनराव घोलप यांनी आता थेट राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेत देवळाली मतदारसंघाबाबत चर्चा केली आहे.

Nashik Political | नाशिक दौऱ्यात राज ठाकरेंचा पदाधिकाऱ्यांना कानमंत्र; उत्तर महाराष्ट्रासाठी मनसेची रणनीती काय?

पक्षप्रवेश करणार असल्याचे केले स्पष्ट

यादरम्यान, सध्या देवळाली मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी बबनराव घोलप यांचे पुत्र योगेश घोलप इच्छुक असून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून योगेश घोलप यांना उमेदवारी मिळावी, याकरिता बबनराव घोलप प्रयत्नशील आहेत. ते लवकरच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश करणार असून, त्यामुळे शिवसेना शिंदे गटाला 1 प्रकारे मोठा धक्का बसणार आहे. बबनराव घोलप पक्ष प्रवेश कधी करणार याबाबत अद्याप तारीख निश्चिती झाली नसून हा प्रवेश नक्की होणार असल्याचे बबनराव घोलप यांनी स्पष्ट केले आहे.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here