Nashik | मागील अनेक वर्षांपासून सातत्याने होत असलेली नाशिक-इंदोर-जयपुर विमानसेवा मागणी अखेर पूर्ण झाली असून इंडिगो विमान कंपनीने 29 ऑक्टोबर पासून नाशिक-इंदोर-जयपुर विमानसेवा सुरू करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. ज्यामुळे आता नाशिकहून जयपुरला तीन तासात पोहोचणे शक्य होणार आहेे. नाशिकहून राजस्थानला नागरिक व पर्यटक मोठ्या प्रमाणात प्रवास करतात. गेल्या अनेक वर्षांपासून अहमदाबाद इंदोरसह अनेक ठिकाणी विमानसेवा सुरू असून आता नाशिकहून राजस्थानला जाण्याचा प्रवास सुखकर होणार आहे.
Nashik News | त्र्यंबकेश्वर येथे पर्यटनासाठी आलेल्या 10 मुलांचा दहशतवादी विरोधी पथकाकडून तपास सुरू
29 तारखेपासून विमानसेवा सुरू
नाशिक-जयपुर विमानसेवेला इंडिगो कंपनीकडून हिरवा झेंडा दिला गेला असून 29 तारखेपासून ही सेवा सुरू करण्यात येत आहे. नियोजित वेळापत्रकानुसार, जयपुरहून सकाळी 11:20 मिनिटांनी विमान उड्डाण घेणार असून नाशिकला दुपारी 2:20 वा. पोहोचणार आहे. त्यानंतर परतीचा प्रवास 2:40 ते 5:30 पर्यंतचा असणार आहे. या विमानसेवेमुळे आता नागरिकांच्या वेळेसोबत पैशांची ही बचत होणार आहे. श
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम