Nashik Crime | नाशकात परदेशातील गांजाची सर्रास विक्री; पोलिसांची सापळा रचत कारवाई

0
22
#image_title

Nashik Crime | नाशिक शहरात थायलंडमधून आणलेला गांजा विक्री होत असल्याचे उघडकीस आले आहे. अमली पदार्थ विरोधी पथकाने या प्रकरणी कारवाई करत गांजा विक्री करणाऱ्या दोघांना पकडून त्यांच्याकडून 686 ग्रॅम वजनाचा गांजा जप्त केला आहे. शहरातील काही व्यावसायिक या गांजाचा नशा करीत असल्याचे पोलिसांच्या तपासातून समोर आले.

Nashik Crime | नाशकात सायबर भामट्यांनी सेवानिवृत्ताकडून 19 लाख उकळले

सापळा रचत पोलिसांची कारवाई

लविन महेश चावला आणि विशाल वसंत बाबा गोसावी अशी दोघा संशयितांची नावे असून या दोघांविरुद्ध अंबड पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तर अमली पदार्थविरोधी पथकाच्या पोलीस निरीक्षक सुशीला कोल्हे यांनी संशयितांना पकडण्यासाठी सापळा रचत कारवाई केली. यामध्ये सहाय्यक निरीक्षक सचिन चौधरी, विशाल पाटील, देवकिसन गायकर, सहाय्यक उपनिरीक्षक रंजन बेंडाळे, बळवंत कोल्हे, अंमलदार बाळासाहेब नांद्रे, अर्चना भड, योगेश सानप, अविनाश फुलपगारे, संजय ताजणे, भारत डंबाळे यांनी त्रिमूर्ती चौकातील शिवशक्ती नगर परिसरात संशयितांचा माग काढला. दोन्ही संशयितांना ताब्यात घेत झडती घेतल्यावर, त्यांच्याजवळून गांजा हस्तगत करण्यात आला. गोसावी हा सराईत गुन्हेगार असल्याचे पोलीस तपासात उघड झाले असून आंतरराष्ट्रीय गांजा नाशिकमध्ये विक्री होत असल्याचा प्रकार पहिल्यांदाच उघड झाला आहे. त्यामुळे पोलिसांकडून संशयितांची सखोल चौकशी सुरू असून गांजा वाहतूक व पुरवठा कोणा मार्फत होत होता त्याबद्दल पोलीस पुढील तपास करीत आहे.

Nashik Crime | नाशकात सराईत गुन्हेगाराकडून पोलीस अंमलदारावर चाकूने हल्ला

संशयितांनी गांजा व्यावसायिकांना विकल्याची माहिती

पोलिसांच्या माहितीनुसार, थायलंडमध्ये गांजाची सर्रास विक्री होते त्यामुळे तेथून गांजासाठा नाशिकला आणण्यात आला. संशयितांनी नाशिकच्या काही व्यवसायिकांना या गांजाची विक्री केली. या व्यवसायिकांकडे केलेल्या चौकशीतून त्यांनी मौज म्हणून गांजा घेतल्याची कबुली दिल्याची सूत्रांची माहिती आहे. नाशिकमध्ये मिळणाऱ्या गांजा 20 रुपये प्रति ग्रॅम दराने मिळतो. तर थायलंड मधील गांजाची किंमत प्रतिग्रॅम 326 रुपये इतकी असल्याचे या तपासातून समोर आले आहे.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here