Nashik Crime | नाशिकच्या दिंडोरीमध्ये पोलीस अंमलदारावर गुन्हेगाराने चाकूने हल्ला केल्याची घटना घडली आहे. दिंडोरी नाक्यावर हातात चाकू फिरवत दहशत निर्माण करणाऱ्या गुन्हेगाराला पकडण्यासाठी गेले असता पोलिस अंमलदाराच्या पोटावर गुन्हेगाराने चाकूने वार केले आहेत. ज्यामध्ये पोलीस अंमलदार जखमी झाले आहेत. ही घटना शुक्रवारी रात्री घडली असून सराईत गुन्हेगार आता वर्दीवरच हल्ला करत असल्याने नागरिकांचे काय असा प्रश्न इथे उपस्थित झाला आहे.
Nashik Crime | नाशकात भररस्त्यात कोयता गँगचा थरार; घटना सीसीटीव्हीत कैद
सराईताला पोलिसांकडून अटक
याबाबत अधिक माहिती म्हणजे, पोलिस अंमलदारावर हल्ला करणाऱ्या अवधूतवाडीतील विकी संजय जाधव याला पोलीस यांनी अटक केली असून या हल्ल्यानंतर पोलीस अंमलदार नामदेव कारभारी सोनावणे यांनी 55 पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
Nashik Crime | सफाई कर्मचाऱ्यांच्या हत्येमध्ये भाजपाचा पदाधिकारी संशयित; पोलिसांकडून शोध सुरू
शुक्रवारी रात्री सव्वा आठ वाजेच्या दरम्यान दिंडोरी नाक्यावरील गीता हार्डवेअर दुकानासमोर संशयित विकी जाधव चाकू हातात मिरवत दहशत निर्माण करत असताना पोलिस अंमलदार नामदेव सोनावणे यांनी त्याला पकडण्यासाठी गेले असता संशयिताने सोनावणे यांच्या पोटावर चाकूने वार करत त्यांना जखमी केले आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम