Nashik Crime | भाजपच्या माथाडी सेलचा शहराध्यक्ष आणि सराईत गुन्हेगार व्यंकटेश मोरे याचा पंडित कॉलनीतील सफाई कर्मचारी आकाश ऊर्फ शुभम संतोष धनवटे याच्या खुनात सहभाग असल्याचे आढळून आले असून पोलीस मोरेचा शोध घेत आहे.
Nashik Crime | नाशकात दिवसाढवळ्या टोळक्याकडून तरुणावर कोयत्याने हल्ला
मंगळवारी घडली होती घटना
मंगळवार दि.1 ऑक्टोबर रोजी सकाळी 6:30 च्या सुमारास पंडित कॉलनीत काम करणाऱ्या आकाशवर तिघांकडून कोयत्याने हल्ला करण्यात आला होता. त्यात तो गंभीर जखमी झाला व उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याबाबत सरकारवाडा पोलीस ठाण्यात मकरंद धनवटे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, व्यंकटेश मोरेसह इतरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून जुन्या वादातून दाखल झालेला गुन्हा मागे घेण्यासाठी किंवा न्यायालयात साक्ष न देण्यासाठी संशयितांकडून आकाशला वारंवार धमकविण्यात आले होते. तसेच मोरे व देशमुखांच्या सांगण्यावरून तिघांनी आकाश वर प्राणघात हल्ला देखील केला होता.
Nashik Crime | आडगाव गुन्हे शोध पथकाची मोठी कामगिरी; बेकायदेशीर पिस्टल बाळगणाऱ्यास केले जेरबंद
न्यायालयाकडून पाच दिवसांची कोठडी
सरकारवाडा व गुन्हे शाखेच्या युनिट एकने संयुक्त तपास करत संशयित अथर्व अजय दाते, मकरंद देशमुख, अभय विजय तुरे आणि एक अल्पवयीन संशयितास ताब्यात घेतले असून न्यायालयाने तिघा संशयितांनी पाच दिवसांची कोठडी सुनावली आहे. तसेच, “चारही संशयितांनी मोरेच्या सांगण्यावरून हल्ला केला आहे का? याबाबत पोलीस पडताळणी करत असून मोरेला पकडण्यासाठी पोलीस मागावर असल्याचे सांगितले जात आहे. त्याला पकडल्यानंतर गुन्ह्याचे खरे कारण समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम