Nashik Crime | धक्कादायक! मालेगावात झुडपात सापडलं नवजात अर्भक

0
40
#image_title

Nashik Crime | नाशिक मधील मालेगाव तालुक्यात काळवाडी फाटा परिसरात नुकतेच जन्माला आलेले बाळ कपड्यात गुंडाळून काटेरी झुडपात टाकून देण्यात आल्याची धक्कादाय घटना घडली आहे. पुरुष जातीचे असलेले हे अर्भक स्थानिक दांपत्याने प्रसंगावधान राखत झुडपातून काढून कळवाडी ग्रामीण रुग्णालयात दाखल केल्याने त्याचे प्राण वाचले आहेत. या बालकाला मालेगावातील सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Nashik Crime | धक्कादायक! चांदवडमध्ये दिवसाढवळ्या तरुणावर कोयत्याने हल्ला

पुरुषप्रधान संस्कृती असलेल्या आपल्या समाजामध्ये वंशाला दिवा हवा म्हणून अनेकदा मुलगी जन्माला येतात तिला निर्दयीपणे टाकून दिल्याच्या घटना आजवर आपण पाहिल्या आहेत. परंतु पुरुष जातीचे असलेले हे अर्भक कपड्यात गुंडाळून काटेरी झुडपात टाकून दिल्याच्या या घटनेने आता सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.

Nashik Crime | नाशकात पूर्ववैमनस्यातून तरुणाचा खून; पोलिसांकडून तासाभरात कारवाई

सोमवारी पांझण डवा कालव्यालगत सापडले अर्भक

सोमवारी दिनांक 23 रोजी कळवाडी परिसरात असलेल्या पाझंण डावा कालव्यालगत भर उन्हात काटेरी झुडपामधून लहान बाळाच्या रडण्याचा आवाज येत असल्याने रस्त्याने जाणाऱ्या दांपत्याने त्या झुडपांमध्ये पाहिले असता त्यांना नुकतेच जन्माला आलेले बाळ कापड्यात गुंडळलेल्या अवस्थेत सापडले. ते बाळ पाहताच दांपत्याला धक्का बसला. त्यांनी तातडीने बाळाला बाहेर काढत कळवाडी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेले रुग्णालयामध्ये डॉक्टर पूनम जाधव यांनी नवजात बालकावर उपचार केल्याने बालकाचे प्राण वाचले आहेत. ही घटना गावात कळताच स्थानिकांनी रुग्णालयात गर्दी देखील केली होती. निर्दयी मातेनं बाळाला घरीच जन्म दिल्यानंतर हे क्रूर कृत्य केले. ज्यामुळे ग्रामस्थांनी आता संताप व्यक्त केला असून मातेचा शोध सुरू आहे. मालेगाव तालुका पोलिसांना या घटनेची खबर लागतात त्यांनी रुग्णालयात भेट देत माहिती जाणून घेतली.

“कळवाडी प्राथमिक आरोग्य केंद्रात बाळाला आणल्यानंतर त्याच्यावर प्राथमिक उपचार केले गेले, त्याच्या गालाला आणि पायाला काटे टोचले होते. उपचारानंतर मात्र बाळाची प्रकृती स्थिर आहे. तसेच हे बाळ सोमवारीच जन्माला आले असून बाळाचा जन्म घरीच झालेला आहे. त्याला आता मालेगाव सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.”

– डॉ. पूनम जाधव, प्राथमिक आरोग्य अधिकारी, कळवाडी, मालेगाव.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here