सोमनाथ जगताप- प्रतिनिधी: देवळा | येथील पंचायत समिती गटशिक्षणाधिकारी सतिश बच्छाव यांनी लोहोणेर येथील म.वि.प्र. समाज संस्थेच्या जनता विद्यालयाच्या नाट्य चमुने नाशिक येथे झालेल्या विभाग स्तरीय विज्ञाननाट्य महोत्सवात प्रथम क्रमांक मिळून राज्यस्तरावर निवड झाल्याबद्दल विद्यार्थी व शिक्षकांना कार्यालयात आमंत्रित करून शैक्षणिक साहित्य व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला.
Deola | देवळा पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी पदी राजेश कदम
याप्रसंगी गटशिक्षणाधिकारी सतिश बच्छाव, विस्तार अधिकारी किरण विसावे, मुख्याध्यापक आर. एच. देसले शिक्षक राकेश थोरात, दौलत पवार, संजय आहिरे, सचिन रौंदळ, अविनाश मोरे, तुषार मोरे, मोहन शिरोळे आदी उपस्थित होते. प्रास्ताविक राकेश थोरात यांनी केले. त्यानंतर नाटिकेचे दिग्दर्शक व मार्गदर्शक शिक्षक सुनिल एखंडे यांनी विज्ञान नाटिके विषयी विस्तृत माहिती देत नाटिकेचा मुख्य विषय व उपविषयाची माहिती दिली. तसेच या नाटिकेतील विद्यार्थ्यांनी साकारलेल्या विविध पात्रांची व भूमिकांची माहिती दिली.
Deola | चिंचवे (नि.) विकास सोसायटीच्या चेअरमन पदी प्रकाश पवार यांची बिनविरोध निवड
सतीश बच्छावांकडून मनोगत व्यक्त
शेवटी गटशिक्षणाधिकारी सतिश बच्छाव यांनी आपले मनोगत व्यक्त करत या यशाबद्दल सहभागी विद्यार्थी रितीक पाटील, दिव्यांशु व्यवहारे, साहिल खैरनार, सोहम सुर्यवंशी, वैदही एखंडे, अक्षदा सुर्यवंशी, अनुष्का दशपुते, अनुष्का गवळी, गुंजन शेवाळे, खुशी बोरसे व मार्गदर्शक शिक्षक सुनिल एखंडे, सचिन रौंदळ, संजय आहिरे, अविनाश मोरे, तुषार मोरे आदींसह मुख्याध्यापक आर. एच. देसले यांचे अभिनंदन करत पुष्पगुच्छ व शाल देऊन सत्कार केला. देवळा तालुक्याचे नाव राज्य स्तरावर पोहोचवल्याबद्दल नाट्य चमुचे कौतुक करत शाबासकीची थाप देत राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम