Nilesh Rane : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमध्ये समुद्रकिनारी राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळल्याची घटना घडली. त्यानंतर महाराष्ट्रात एकच संतापाची लाट उसळली. या दुर्घटनेविषयी विरोधी पक्षाकडूनही आक्रमक भूमिका घेण्यात आल्या. सदर प्रकरणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळ्याच्या बांधकामात सहभागी असलेला बांधकाम सल्लागार चेतन पाटील याला कोल्हापूर पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आला आहे. तर पुतळा कोसळल्या प्रकरणातील मुख्य आरोपी जयदीप आपटे बेपत्ता आहे. हे प्रकरण सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात तापलेलं असतानाच भाजपने नेते निलेश राणे यांच्याकडून खळबळ जनक दावा करण्यात आला आहे. भाजप नेते निलेश राणे यांनी त्यांच्या ऑफिशियल ‘X’ (ट्विटर) अकाउंटवरून ट्विट करत शिवसेना उद्धव ठाकरे गटातील एका नेत्यावरती गंभीर आरोप केला आहे. ठाकरे गटाचा नेमका तोच नेता घटना घडल्यानंतर अवघ्या पंधरा मिनिटात पुतळ्याजवळ कसा काय पोहोचला? असा प्रश्न विचारला आहे.
CM Eknath Shinde | ‘शिवरायांच्या चरणी मस्तक ठेऊन माफी मागतो पण…’; मुख्यमंत्र्यांचे विरोधकांना आवाहन
Nilesh Rane | काय म्हणालेत निलेश राणे?
“नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार, ज्या दिवशी शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला त्यावेळेस उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आमदार वैभव नाईक घटना घडल्यानंतर पंधराव्या मिनिटाला घटनास्थळी पोहोचला होता. आजूबाजूला कोणताही नियोजित कार्यक्रम नसताना आणि राहतं घर हे शहरापासून जवळ जवळ 50 किलोमीटर लांब असताना वैभव नाईक 15 मिनिटात घटनास्थळी कसा काय पोहोचू शकतो? जर का यातलं काही वैभव नाईक याने घडवलंय तर आत्ताच बोटीत बसून दुबई किंवा पाकिस्तानला जाण्याची तयारी ठेवावी.” असे ट्विट निलेश राणे यांनी केले आहे.
निलेश राणेंच्या या खळबजानक दावा करणाऱ्या ट्विटनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. त्याचबरोबर दुसरीकडे या प्रकरणातील एका आरोपीला पोलिसांना ताब्यात घेण्यात यश आले असून त्याचे नाव चेतन पाटील असे आहे. त्यांने पुतळ्याच्या उभारणीमध्ये बांधकाम सल्लागार म्हणून काम केले होते. तर किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याचे कंत्राट घेतलेला जयदीप आपटे अजूनही पोलिसांच्या हाती लागला नाही.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम