Child Harassment | विकृत मानसिकता थांबेना; केळीच्या बागेत नेऊन अल्पवयीन मुलीवर बलात्कार

0
89
Rape Case
Rape Case

Child Harassment : जळगाव जिल्ह्यातून मनाला ठेच लावून जाणारी घटना उघडकीस आली आहे. जामनेर तालुक्यातील एका गावात 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर केळीच्या शेतात लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक बाब आता समोर आली आहे. ही धक्कादायक घटना 28 ऑगस्टच्या सकाळी भर दिवसा दहा ते साडेदहाच्या दरम्यान घडली. पीडित मुलगी शौचास गेली असता संशयित आरोपीकडून अत्याचार केले गेल्याची बाब समोर आली. याप्रकरणी जामनेर पोलीस स्थानकात संशयित आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Sexsual Abuse Case | बाप-लेकीच्या नात्याला काळीमा; पित्याकडूनच पोटच्या मुलीवर अत्याचार

जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यात 15 वर्षीय पीडीत मुलगी आपल्या आई-वडिलांसोबत राहते. तिचा परिवार उदरनिर्वाहासाठी मजुरी काम करतो. 28 तारखेला पीडित मुलगी शौचास गेली असताना संशयित आरोपी सुनील भिलेने अल्पवयीन मुलीला जबरदस्तीने केळीच्या बागेत नेवून तिच्यावर अत्याचार केले. पीडित मुलीने हा संपूर्ण प्रकार जेव्हा घरी सांगितला, तेव्हा पिडीतेच्या आई-वडिलांनी जामनेर पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली.

Akola Harassment Case | राज्यात विकृतांचा कल्लोळ ! अश्लील व्हिडिओ दाखवत शाळेच्या शिक्षकाकडूनच…

लवकरच प्रकरण न्यायालयात घेऊन जाणार असल्याची माहिती

याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक दिपक रोठे संपूर्ण तपास करत असून संशयित आरोपी सुनील भिलेला अटक करण्यात आली आहे. अखेरचे वृत्त हाती येताच संपूर्ण प्रकरण न्यायालयात सादर केले जाईल. महिलांवरील होणाऱ्या अत्याचाराला आळा घालण्यासाठी शासन नवनवीन कायदे अमलात आणत आहे. तरीही स्त्रियांवर होणारे अत्याचार काय थांबण्याचे नाव घेत नाहीत.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here