सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा | महालपाटणे (ता. देवळा) येथे घरफोडी झाली असून, यात अज्ञात चोरट्यांनी रोख रक्कम ६१ हजार रुपये चोरून नेले आहेत. या घटनेचा देवळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या बाबत देवळा पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी कि, महालपाटणे (ता. देवळा) येथील समीर विक्रम जगताप यांच्या राहत्या घरी गुरुवारी दि. ९ ते रविवारी दि. १२ रोजी सकाळी १० वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून घरातील रोख रक्कम ६१ हजार रुपये चोरून नेले आहेत. या घटने बाबत देवळा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक देवरे करीत आहेत.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम