वैभव पगार – प्रतिनिधी : दिंडोरी | नाशिक जिल्ह्यातील 40 परीक्षा केंद्रावर जवाहर नवोदय विद्यालयाची 18 जानेवारी 2025 रोजी निवड चाचणी परीक्षा भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयांतर्गत चालविल्या जात असलेल्या व नवोदय विद्यालय समिती नवी दिल्ली द्वारा संचालित, खेडगाव येथील पीएमश्री स्कूल, जवाहर नवोदय विद्यालयात शैक्षणिक सत्र 2025-26 करिता इयत्ता सहावीच्या प्रवेशासाठी निवड चाचणी परीक्षा शनिवार दिनांक 18 जानेवारी 2025, रोजी सकाळी 11.00 वाजतापासून दुपारी 1.30 वाजेपर्यंत होणार आहे. ही परीक्षा नाशिक जिल्ह्यातील 40 परीक्षा केंद्रावर आयोजित करण्यात आलेली आहे.
ज्या विद्यार्थ्यांनी इयत्ता सहावीच्या प्रवेशासाठी, जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश चाचणी परिक्षा -2025 चे आवेदनपत्र ऑनलाइन पद्धतीने भरलेले आहेत. त्या विध्यार्थ्यांच्या शिक्षकांना, मुख्याध्यापकांना व पालकांना सूचित करण्यात येत आहे की, जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश चाचणी परिक्षा -2025 चे आवेदनपत्र www.navodaya.gov.in किंवा https://cbseitms.rcil.gov.in/nvs/AdminCard/AdminCard या संकेतस्थळावरून आवेदनपत्राचा रजिस्ट्रेशन क्रमांक हा लॉगीन आयडी व जन्मतारीख ही पासवर्ड, वापरून डाऊनलोड करुन घ्यावयाचे आहेत. तसेच प्रवेश पत्र, परीक्षा लेखन साहित्य व ओळखपत्र सोबत घेऊन प्रवेश पत्रावर नमूद केलेल्या परीक्षा होत आहे. केंद्रावर, परीक्षार्थी/ विध्यार्थ्यांना सकाळी 10.30 पूर्वी उपस्थित रहावयाचे आहे, असे आवाहन प्राचार्य श्री. एस.व्ही.स्वामी यांनी केले.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम