Ajit Pawar | ‘तुम्हाला इथे झक मारायला ठेवलंय का?’; सर्वांसमोर पवारांनी अधिकाऱ्याला झापलं

0
107

Ajit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे अध्यक्ष व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे त्यांच्या स्पष्ट वक्तेपणामुळे प्रसिद्ध आहे. त्यांच्या तापट स्वभाव आणि सडेतोड वक्तव्यांचे अनेक किस्से प्रसिद्ध आहेत. कामाच्या बाबतीत कसलीही दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांची अजित पवार वारंवार कान उघडणी करत असतात. या आधी देखील पुण्यामध्ये अनेक अधिकाऱ्यांना कामांमध्ये केलेल्या दिरंगाई वरून अजित पवार यांनी चांगलेच फैलावर घेतले आहे. असाच एक प्रकार पुन्हा एकदा घडला. पुण्यामध्ये जीएसटी भवनाच्या इमारतीचे उद्घाटन करायला आलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पीडब्ल्यूडी अधिकाऱ्याला चांगलंच फैलावर घेतलं.

पुण्यातील जीएसटी भवनाच्या इमारतीच्या उद्घाटना बरोबरच वडगावशेरी मतदार संघातील 300 कोटींच्या विकास कामांचे भूमिपूजन देखील उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुण्यामध्ये पार पडलं. यावेळी मुख्यमंत्री यांनी तेथील कामाची पाहणी केली असता काही कामे फक्त वरवर दाखवण्यापूर्ती केली असल्याचे त्यांच्या लक्षात आले. तेव्हा कसलीही घाई न करता अजित पवारांनी अधिकाऱ्याची कान उघडणी केली.

Ajit Pawar | ‘अशा आरोपींचं सामानच काढून टाकलं पाहिजे’; बदलापूर प्रकरणावरुन दादांना राग अनावर

नेमके काय घडले

जीएसटी भवनाच्या इमारतीचे उद्घाटन करण्यासाठी उपमुख्यमंत्री गाडीतून बाहेर निघाले आणि इमारतीकडे जाणाऱ्या पहिल्याच पायरीवर सिमेंट पडले होते. ते पाहून त्यांनी हे इथे असं का ठेवलं असा प्रश्न केला तेव्हा अधिकाऱ्याने ते साफ करायचं राहिलं असं उत्तर दिलं. असं म्हणताचं अजित पवारांचा पारा चढला आणि त्यांनी “तुम्हाला माहिती आहे ना मी किती बारीक तपासतो तरीही हे इथे काय झक मारायला ठेवलंय का?” असा प्रश्न विचारत अधिकाऱ्याला सर्वांसमोर झापले. पुढे पाहणी करत असताना इमारतीच्या आतल्या बाजूस असलेल्या मोकळ्या जागेत ड्रेनेज चेंबर रस्त्याच्या मधोमध ठेवण्यात आला होता. हे पाहून अजित पवारांचा पुन्हा एकदा संताप झाला. “अशी छातूगिरी करू नका.” अशा शब्दात उपमुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्याला बजावलं.

Press Conference | अजित पवार घेणार महत्त्वाची पत्रकार परिषद…. काय वळण घेणार महाराष्ट्राचा राजकारण?

वडगावशेरी मतदार संघात नाराजी

तर दुसरीकडे विधानसभा निवडणुकींच्या तोंडावरती वडगाव शेरी विधानसभा मतदार संघात नाराजी असल्याचं चित्र पहायला मिळत आहे. जगदीश मुकुळ यांनी राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार “सुनील टिंगरे यांना महायुतीचा धर्म पाळण्याचा विसर पडलाय.” असं वक्तव्य केलं होतं. त्यानंतर, “मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचा आम्हाला कायम आदर असून महायुतीच्या नेत्यांना डावलण्याचा प्रयत्न नाही. अशी प्रतिक्रिया सुनील टिंगरे यांनी दिली. तर हे कार्यक्रम सरकारचे आहेत व या कार्यक्रमात मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री आमच्या स्तरावर ठरवण्यात आले आहेत. तेव्हा काही गैरसमज झाले असतील तर ते दूर करावेत असे म्हणत अजित पवारांनी यावर प्रतिक्रिया दिली.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here