BJP-Thackeray Group Rada | शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते आमदार आदित्य ठाकरे हे आज छत्रपती संभाजी नगरच्या दौऱ्यावर होते. त्यावेळी आदित्य ठाकरे संभाजीनगर मध्ये दाखल झाले असता भाजपकडून त्यांच्या या दौऱ्याला तीव्र प्रतिकार करण्यात आला. आदित्य ठाकरेंच्या या दौऱ्याला विरोध करत भाजपच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरत घोषणाबाजी केली. छत्रपती संभाजीनगरमधील रामा हॉटेल बाहेर भाजपच्या कार्यकर्त्यांकडून आदित्य ठाकरे यांच्या संभाजीनगरच्या दौऱ्याला विरोध करत घोषणाबाजी करण्यात आली. त्यावेळी उद्धव ठाकरे गटाचे कार्यकर्ते भाजपच्या कार्यकर्त्यांना भिडले व दोन गटांमध्ये तुफान राडा झाला. दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी करण्यात आली.
Political News | शिंदे फडणवीसांसमोर ठाकरे देणार तगडे आव्हान; कोणता डाव टाकणार..?
BJP-Thackeray Group Rada | आदित्य ठाकरेंच्या दौऱ्याला विरोध
शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे (Thackeray Group) आमदार आदित्य ठाकरे यांनी संभाजीनगर येथे दौऱ्याचे आयोजन केले होते. यावेळेस त्यांच्या या दौऱ्याला विरोध करत भाजपाच्या (BJP) कार्यकर्त्यांनी संभाजीनगर येथील रामा हॉटेल बाहेर या दौऱ्याविरोधात आंदोलन केले. कार्यकर्त्यांकडून आदित्य ठाकरे यांना काळे झेंडे दाखवत घोषणाबाजी केली गेली. त्याचबरोबर दिशा सलीयानचे फोटो असलेले बॅनर झळकवत आदित्य ठाकरे यांना भाजपच्या कार्यकर्त्यांनी निषेध दर्शवला. यावेळी उपस्थित असलेल्या ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन करणाऱ्या भाजपच्या कार्यकर्त्यांना उत्तर दिले.(BJP-Thackeray Group Rada)
Rajyasabha Eelection | महायुतीचे दोन नवे खासदार..!; दोन्ही उमेदवारांची बिनविरोध निवड
भाजप कार्यकर्त्यांनी आदित्य ठाकरे यांना दाखवले काळे झेंडे
ठाकरे गटाकडून संभाजीनगर येथे आदित्य ठाकरे यांचा दौरा आयोजन्यात आला होता. या दौऱ्यानिमित्त आदित्य ठाकरे संभाजीनगर येथील रामा हॉटेल येथे वास्तव्यास होते. ते आज पैठण येथील वैजापूर तालुक्यात शेतकरी संवाद मेळाव्यात सहभागी होणार होते. परंतु त्यांचा दौरा सुरू होण्याआधीच भाजप कार्यकर्त्यांकडून दौऱ्याला विरोध करणारं आंदोलन केलं गेलं. आदित्य ठाकरे यांनी ज्या हॉटेलमध्ये निवास घेतला होता. त्या हॉटेल बाहेर भाजपच्या कार्यकर्त्यांनी दिशा सलियन प्रकरणाबाबत ‘जबाब दो’ असे म्हणत जोरदार घोषणाबाजी केली. त्यानंतर ठाकरे गटाचे कार्यकर्ते देखील आंदोलन स्थळी पोहोचले व दोन गटांमध्ये बाचाबाची झाली आणि कार्यकर्ते एकमेकांवर धावून गेल्याने वाद चिघळला.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम