Deola | देवळा तालुक्यात संततधार; खर्डे परिसराला वरदान ठरणारे वार्षि धरण ‘ओवरफ्लो’

0
29
Deola
Deola

सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा |  देवळा तालुक्यातील पश्चिम भागात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे खर्डे परिसराला वरदान ठरणारे वार्षि धरण रविवारी (दि.२५) रोजी रात्री ओहरफ्लो झाल्याने या भागातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे. या पाण्याने कोलथी नदी दुथडी भरून वाहू लागल्याने खर्डे येथे नदीला आलेले पाणी बघण्यासाठी सकाळी नदीकाठी लोकांनी गर्दी केली होती. गेल्या वर्षी अत्यल्प पावसामुळे वार्षि धरण पूर्ण भरले नसल्याने खर्डे, कनकापूर, वार्षि, हनुमंतपाडा, शेरी व कांचने याठिकाणी तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली होती.

Deola | कनकापुर येथे विद्यार्थी व ग्रामस्थांच्या वतीने तीन हजार रोपांची लागवड

या गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा करण्यात आला. पाण्याअभावी उन्हाळी कांद्याची लागवडदेखील झाली नसल्याने नागरिकांना भीषण दुष्काळाचा सामना करावा लागला. खर्डे व पंचक्रोशीत गेल्या दोन दिवसांपासून पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे कणकापूर येथील सर्व पाझर तलाव व वार्षि येथील धरण ओहरफ्लो झाल्याने संभाव्य पाणी टंचाई दूर झाली असून, कोलथी नदीच्या पाण्याने पुढे खर्डे येथील दोडी पाझर तलावही भरल्याने समाधान व्यक्त करण्यात आले.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here