Jansanman Yatra | गुलाबी जॅकेट घालून, गुलाबी बसमध्ये बसून ‘दादा’ महाराष्ट्र पिंजून काढणार

0
64
Jansanman Yatra
Jansanman Yatra

नाशिक :  आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांची जोरदार तयारी सुरू आहे. मात्र, अजित पवारांनी चांगलीच कंबर कसल्याचे दिसत आहे. लोकसभा निवडणुकीत राज्यात महायुतीला मोठा फटका बसला. मात्र, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा केवळ एक खासदार निवडून आल्याने त्यांचा चांगलाच धुव्वा उडाला. दरम्यान, याची अजित दादांनी चांगलीच धास्ती घेतली असून, विधानसभेसाठी ते जंग जंग पछाडणार असल्याचे दिसत आहे. यासाठी आजपासून अजित पवारांच्या जनसन्मान यात्रेला नाशिकमधून सुरुवात होत असून, या यात्रेसाठी राष्ट्रवादीकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. या जनसन्मान यात्रेच्या माध्यमातून अजित पवार महाराष्ट्र पिंजून काढणार आहेत. (Jansanman Yatra)

महायुतीतील आग विझवण्यासाठी दिंडोरीतून यात्रेला सुरुवात..?

राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिंडोरी विधानसभा मतदारसंघातून विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांची उमेदवारी जाहीर केली असून, यामुळे दिंडोरीत अजित पवार गट आणि शिंदे गटात वादाची ठिणगी पडली असल्याने ही आग विझवून आपल्या उमेदवाराचे राजकीय वजन वाढवण्यासाठी अजित पवार दिंडोरी विधानसभा मतदारसंघातून आपल्या जनसन्मान यात्रेला सुरुवात करणार आहेत. दरम्यान, एकाच आठवड्यात अजित पवार आज दुसऱ्यांदा नाशिकमध्ये आले आहेत. (Ajit Pawar Jansanman Yatra)

NCP Ajit Pawar | नाशिकमधील अजित पवार गटाचा पहिला उमेदवार जाहीर

Jansanman Yatra | गुलाबी रंग आणि लाडक्या बहिणींना विशेष प्राधान्य

या यात्रेतही गुलाबी रंगाला आणि लाडकी बहीण योजनेला विशेष प्राधान्य देण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून अजित पवार हे केवळ गुलाबी जॅकेटमध्येच दिसत असून, जिल्हाभरात लावण्यात आलेले बॅनरही गुलाबी रंगातच सजवण्यात आलले आहेत. अवढेच नाहीतर या यात्रेसाठी अजित पवार हे गुलाबी रंगाच्या बसमधून फिरणार असून, या बसवरही लाडकी बहीण योजनेची माहिती लावण्यात आली आहे. तर, या यात्रेच्या आयोजनासाठी नेमण्यालेल्या सदस्यांनाही गुलाबी रंगाचे जॅकेट घालण्यात आलेले आहे.

बस, ताफा, स्टाफ, बॅनर सगळं गुलाबी 

आजपासून अजित पवार यांची जनसन्मान यात्रा सुरू होणार असून, या यात्रेला झिरवाळ यांच्या दिंडोरी विधानसभा मतदारसंघातून सुरुवात होणार आहे. या यात्रेसाठी अजित पवार यांच्या ताफ्यातील वाहनांनाही गुलाबी रंग देण्यात आला आहे. असेच या यात्रेत सामील झालेले राष्ट्रवादीचे नेतेही गुलाबी रंगाची बस आणि गुलाबी रंगाच्या वाहनांतून प्रवास करणार आहेत. तर, या यात्रेतील बसवरही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची माहिती लावण्यात आलेली आहे. तर, यात्रेच्या आयोजना करणाऱ्या टीम मेंबर्सनेही गुलाबी रंगाचे जॅकेट्स घातलेले आहेत.

Mumbai Nashik Highway | अजित पवार ॲक्शन मोडवर; मुंबई-नाशिक महामार्गावरील टोल वसूली बंद

योजनेचे श्रेय आपल्याकडे खेचण्याचा अजित पवार गटाचा प्रयत्न 

आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर मध्य प्रदेशच्या धर्तीवर महायुतीने लाडकी बहीण योजनेचा डाव टाकला असून, या योजनेच्या माध्यमातून महिला वोट बँक तयार करण्याचा प्रयत्न असल्याची दबक्या आवाजात चर्चा आहे. तर, या योजनेचे श्रेय आपल्याकडे खेचण्यासाठी अजित पवार गटाचा हा प्रयत्न असल्याचेही बोलले जात आहे. त्यामुळे अजित पवार यांच्या या जनसन्मान यात्रेला किती प्रतिसाद मिळतो आणि याचा अजित पवार गटाला खरंच विधानसभेला फायदा होणार का..? हे पहावे लागणार आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here