सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा | कर्मचाऱ्यांच्या न्याय हक्कांसाठी राज्य अध्यक्ष तथा माजी मंत्री बच्चु कडू व राज्य सरचिटणीस गिरीश दाभडकर यांच्या नेतृताखाली एनजीपी ४५११ ही संघटना लढत आहे व त्यांचे हात बळकट करण्यासाठी व कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी देवळा तालुक्यात संघटना कार्यान्वित करण्यात आली आहे. तळागाळातील कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लागावेत म्हणून तालुक्यातही संघटनेचा विस्तार करण्यात आला असून संघटनेची मासिक सभा नुकतीच उमराणे ग्रामपंचायत सभागृहात घेण्यात आली.
यावेळी संघटनेचे कर्मचारी शुभानंद देवरे यांनी सांगितले की, आपणास आज सर्वांच्या उपस्थितीत नवीन तालुका कार्यकारणी जाहीर करायची आहे. त्यावर सर्वानुमते अध्यक्ष म्हणून लोहोणेर ग्रामपंचायतीचे लिपिक भूषण अहिरे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. त्यानंतर उपाध्यक्ष म्हणून तालुक्यातील उमराणे ग्रामपंचायतीचे लिपिक संघटनेचे ज्येष्ठ कर्मचारी पवन देवरे यांची निवड करण्यात आली. यानंतर सचिव पदासाठी मेशी ग्रामपंचायतीचे लिपिक दीपक सूर्यवंशी यांचे नाव पुढे करण्यात आले. तर सहसचिव म्हणून भऊर येथील लखन गरुड यांची निवड करण्यात आली.
Satana | ‘एनजीपी ४५११’ बागलाण तालुका ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेची नूतन कार्यकारिणी घोषित
जिल्हा संघटक म्हणून वाजगाव ग्रामपंचायतीचे लिपिक संघटनेचे माजी अध्यक्ष शुभानंद देवरे यांची, तर जिल्हा प्रतिनिधी म्हणून विजय शिरसाठ, वैभव आहेर, यांची नेमणूक करण्यात आली. तर तालुका सदस्य पदी ईश्वर मोरे (मटाने), संजय सोनवणे (माळवाडी), पुंडलिक सावंत (डोंगरगाव), अमोल देवरे (उमराणे), गोरख शिरसाठ (खारीपाडा), केदा कोकरे (विठेवाडी), संदीप बच्छाव (वराळे), सचिन भदाणे (कापशी), प्रभाकर वाघ (पिंपळगाव), महेंद्र बच्छाव (वरवंडी), प्रकाश शिंदे (कनकापुर), योगेश देवरे (दहिवड), भाऊसाहेब अहिरे (तिसगाव) आदी सदस्यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
नवनिर्वाचित अध्यक्ष भूषण अहिरे यांनी सांगितले की, “या अगोदर ज्या संघटनेत राहून आपण काम केले. त्यात नक्कीच आपले हित जोपासले गेले नाही. त्यामुळे आपण आता नव्याने आपल्या सर्व कर्मचाऱ्यांना न्याय देण्यासाठी प्रयत्नशील राहणार. त्यासाठी आपल्या सर्वांच्या सहकार्याची आवश्यकता आहे. यावेळी अनिल गोसावी, सतीश अहिरे, भाऊसाहेब निकम, एकनाथ बच्छाव, कांतीलाल सोनवणे, साहेबराव माळी, समाधान केदारे, राहुल बुजवा, हिलाल गरुड, अशोक सोळसे, संजय जगताप भीमराव केदारे आदींसह तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचारी मोठ्या संख्यने उपस्थित होते.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम