Ajit Pawar In Nashik | नाशकात दादांचा मोठा डाव; शरद पवारांचा निष्ठावंत अजित पवारांच्या गळाला..?

0
52
Ajit Pawar In Nashik
Ajit Pawar In Nashik

नाशिक :  विधानसभेच्या पार्श्वभूमीवर आजपासून अजित पवारांनी जनसन्मान यात्रा सुरू केली आहे. या यात्रेची सुरुवात अजित पवार नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी मतदार संघातून करणार आहेत. या यात्रेच्या माध्यमातून अजित पवारांचा प्रत्येक विधानसभा मतदार संघात पोहोचण्याचा मानस आहे. यासाठी जय्यत तयारी करण्यात आली असून, आता पुढील चार दिवस अजित पवारांचा नाशिकमध्ये मुक्काम असणार आहे. या चार दिवसांत अजित पवार नाशिक जिल्ह्यातील सर्व १५ विधानसभा मतदार संघात जाऊन तेथील राजकीय वातावरणाचा आढावा घेणार आहेत.

यात्रेच्या सुरुवातीलाच अजित पवारांचा मोठा डाव..?

दरम्यान, यात्रेच्या सुरुवातीलाच अजित पवारांनी मोठा डाव टाकला असून, शरद पवारांना मोठा धक्का दिला आहे. दिंडोरी तालुक्यातून यात्रेला सुरुवात होणार असून, येथे अजित पवारांनी शरद पवारांचा कट्टर निष्ठावंत समर्थक फोडल्याचे दिसत आहे. दिंडोरी तालुक्यातील कादवा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन तथा शरद पवार (Sharad Pawar) यांचे नाशिक जिल्ह्यातील कट्टर निष्ठावंत समर्थक श्रीराम शेटे (Shriram Shete) हे आता अजित पवार (Ajit Pawar) गटाची वाट धरणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

याचे कारण म्हणजे मागील आठवड्यात अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे (Sunil Tatkare) हे नाशिक दौऱ्यावर आले असता, श्रीराम शेटे हे त्यांच्या स्वागताला उपस्थित होते. तसेच यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत जाण्याचेही संकेत दिल्याचे बोलले जात आहे. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या दिंडोरी येथील सभेच्या ठिकाणीही शेटे यांनी अजित पवारांच्या स्वागताचे फ्लेक्स लावले आहेत. त्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या असून, जिल्ह्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे.

Jansanman Yatra | गुलाबी जॅकेट घालून, गुलाबी बसमध्ये बसून ‘दादा’ महाराष्ट्र पिंजून काढणार

कोण आहेत श्रीराम शेटे..?

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाल्यापासून श्रीराम शेटे (Shriram Shete) हे शरद पवारांसोबत होते. ते राष्ट्रवादीचे नाशिक जिल्ह्यातील पहिले जिल्हाध्यक्ष राहिलेले आहेत. राष्ट्रवादीतील फुटीनंतर नाशिक जिल्ह्यातील सर्व आमदार अजित पवारांसोबत गेले. मात्र, श्रीराम शेटे यांनी कोणत्याही परिस्थितीत शरद पवारांची साथ सोडणार नसल्याचे म्हणत शरद पवारांसोबतच राहण्याची भूमिका घेतली होती. तर, आता शेटे आपली भूमिका बदलणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.

Ajit Pawar In Nashik |  पुढील चार दिवस दादांचा नाशकात मुक्काम 

दरम्यान, जनसन्मान यात्रेच्या निमित्ताने आता पुढील चार दिवस उपमुख्यमंत्री अजित पवार हे नाशिकमध्ये तळ ठोकणार असून, जिल्ह्यातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघांमध्ये पोहोचून तेथील राजकीय परिस्थिती, प्रयत्न करणार आहेत. या यात्रेची सुरुवात आज नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी विधानसभा मतदारसंघातून होत असून, यासाठी जिल्ह्यातील आमदार, पदाधिकाऱ्यांकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे.

Ajit Pawar NCP Crisis | ‘दादा’ वेश बदलून दिल्लीला जायचे..?; राष्ट्रवादीतील भूकंपाची इनसाइड स्टोरी..!

अजित दादा जिल्ह्यात कोणते राजकीय भूकंप घडवणार..?

आज सकाळपासूनच जिल्ह्यात पाऊस सुरू असून, या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून सर्व उपाययोजना करण्यात आल्या आहेत. आजच्या सभेला पक्षाचे सर्व वरिष्ठ नेते, मंत्री, आमदार, पदाधिकारी उपस्थित असणार आहेत. तर, पुढील चार दिवस अजित पवार नाशकात असून, पहिल्याच दिवशी शरद पवारांचा निष्ठावंत नेता गळाला असल्याची चर्चा असताना आता पुढील चार अजित दादा कोणती जादूची कांडी फिरवणार आणि जिल्ह्यात कोणते राजकीय भूकंप येणार..? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here