सिन्नर : सिन्नर-इगतपुरी विधानसभा मतदार संघातील इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागातील अत्यंत दयनीय अवस्था असलेल्या तातळेवाडी ते टाकेद खुर्द रस्त्याची दुर्दशा लक्षात घेऊन आमदार माणिकराव कोकाटे यांनी हा रस्ता प्रश्न अर्थसंकल्प आदिवासी उपाययोजना अंतर्गत (T6) मध्ये (ग्रामा १५) कीमी प्रशासकीय मान्यता 120 लक्ष हा कायमचा निकाली लावला असून या रस्त्यासाठी आमदार माणिकराव कोकाटे यांनी जवपळपास 95 लाख रुपयांचा निधी मंजूर केला असून हा पूर्ण रस्ता डीएलसी प्रणालीवर उत्तम काँक्रीट दर्जाचा होणार आहे. या रस्त्याच्या कामाला नुकतीच सुरुवात झाली आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून तातळेवाडी ते टाकेद खुर्द या रस्त्याची अत्यंत दयनीय दुरवस्था झाली होती. या रस्त्यावर समृद्धी महामार्गाच्या कामामुळे अवजड वाहनांच्या वाहतुकीमुळे आणखीच रस्त्याची बारादारी झाली होती. या रस्त्यावरून टाकेद परिसरातील अनेक वाड्या वस्त्यांमधील आदिवासी बांधव व्यापारी, व्यवसायिक, शालेय विद्यार्थी कायम ये-जा करत होते. या सर्व समावेशक बाजूने सर्वांचा खड्डेमय रस्त्यातील जीवघेणा प्रवास कधी थांबणार. असा यक्ष प्रश्न या परिसरातील वाहनधारकांना प्रवाश्यांना पडला होता. यासंदर्भात या परिसरातील सामाजिक कार्यकर्ते राम शिंदे, राष्ट्रवादी चे जिल्हाध्यक्ष डॉ श्रीराम लहामटे, नवनाथ निर्मळ, दौलत बांबळे, सरपंच सचिन बांबळे, बहिरू लगड, भगवान भोईर, विजय बांबळे, रंगनाथ लगड, आदींसह अनेक कार्यकर्त्यांनी आमदार माणिकराव कोकाटे यांच्याकडे सतत पाठपुरावा केला होता. अखेर या सर्व कार्यकर्त्यांच्या मागणीला यश आले.
Igatpuri | आ. कोकाटे यांनी शब्द पाळला; डी.एल.सी धर्तीवर टाकेद ते धामणगाव रस्त्याचे काम पूर्ण
आमदार माणिकराव कोकाटे यांनी या रस्त्याचा प्रश्न आदिवासी उपाययोजना निधीतून मंजूर करत या रस्त्यासाठी जवळपास 95 लक्ष रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. अखेर आमदार कोकाटे यांच्या प्रयत्नामुळे आदिवासी बांधवांचा जीवघेणा प्रवास थांबला. दरम्यान आमदार माणिकराव कोकाटे यांच्या विजयात टाकेद गटातील गोरगरीब आदिवासी समाजबांधव यांनी मतदानातून अत्यंत महत्वाची निर्णायक भूमिका बजावली होती. त्याची जाणीव ठेवून आमदार माणिकराव कोकाटे यांनी या टाकेद गटातील पिंपळगाव मोर ते वासाळी जुना घोटी कोल्हार रस्ता, टाकेद ते धामणगाव, टाकेद ते टाकेद तीर्थ, खडकेद ते पडवळवाडी, तातळेवाडी ते टाकेद खुर्द, इंदोरे ते कळसुबाई माची मंदिर, बोरीची वाडी ते धामणी फाटा यासह या परिसरातील अनेक रस्ते मंजूर करून पूर्ण केले व काही मंजुरीला घेतले आहेत.
यांसह आमदार माणिकराव कोकाटे यांनी म्हैसवळण घाट मार्गे टाकेद ते वासाळी फाटा मार्गे आंबेवाडी व तेथून भावली इगतपुरी या रस्त्यासाठी जवळपास 900 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून लवकरच या रस्त्याचे टेंडर फ्लॅश होणार असल्याची माहिती कोकाटे यांचे स्वीय सहाय्यक संजय डावरे यांनी नुकतीच दिली आहे. यासोबतच टाकेद तीर्थ ते टाकेद गाव व चौकातील गाव अंतर्गत सर्वच रस्त्यांसाठी जवळपास 5 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. यात डीएलसी प्रणालीवर टाकेद गावातील काँक्रीट रस्ता पूर्ण होणार आहे. साधारण पावसाळा उघडताच या रस्त्यांच्या कामाला सुरुवात होणार असल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
Igatpuri | आ. कोकाटेंच्या प्रयत्नातून स्वातंत्र्य काळानंतर पहिल्यांदाच नांदूरकीपाड्यात पोहोचला रस्ता
“वर्षानुवर्षे टाकेद गटातील असलेली रस्त्यांची दुरवस्था अखेर आमदार माणिकराव कोकाटे यांनी कायमची सोडवली असून या परिसरातील अन्य राहिलेले रस्ते देखील लवकरच मंजूर करून पूर्ण करणार असल्याची माहिती आमदार कोकाटे यांनी दिली आहे.सर्व समाजबांधवांच्या वतीने आमदार माणिकराव कोकाटे यांचे मनापासून आभार”
– डॉ. श्रीराम लहामटे (जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट)
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम