Ladki Bahin Yojana | राज्याचे अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ (mukhyamantri mazi ladki bahin yojana) या योजनेची घोषणा कल्यानंतर आज दि. १ जुलैपासून या योजनेसाठी नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे. या योजने अंतर्गत राज्यातील २१ ते ६० वयोगटातील पात्र महिलांना सरकारकडून दर महिन्याला १,५०० रुपये आर्थिक मदत देण्यात येणार आहे.
दरम्यान, आज पहिल्याच दिवशी या योजनेच्या नोंदणीसाठी महिलांचा उत्साह मोठ्या प्रमाणात दिसून आला. अनेक सेतू केंद्र व तहसील कार्यालयांत महिलांनी गर्दी केली होती. १ जुलै ते १५ जुलै ही नोंदणीसाठीची मुदत असून, नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर लाभार्थी महिलांची यादी जारी केली जाईल आणि त्यात पात्र महिलांनाच या योजनेचा लाभ घेता येणार आहे. (Ladki Bahin Yojana)
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महिला मतदारांना समोर ठेऊन मध्य प्रदेश सरकारच्या ‘लाडली बहना’ या योजनेप्रमाणे महाराष्ट्र सरकारकडून ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ ही योजना सुरू करण्यात आली आहे. मध्य प्रदेशात या योजनेचा फायदा भाजपला या ओकसभा निवडणुकीतही झाला असून, तिकडे सर्व जागांवर भाजपने विजय मिळवला. याच पार्श्वभूमीवर आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने या योजनेचा भजपप्राणित महायुती सरकारला कसं फायदा होणार..? हे पहावे लागणार आहे. दरम्यान, यो योजनेसाठी कोणत्या महिला पात्र असणार आहेत..? या योजनेचा कोणकोणत्या महिलांना घेता येणार..? हे जाणून घेऊयात…
Ladki Bahin Yojna | महाराष्ट्रातील महिलांना मिळणार प्रतिमाह १,५०० रुपये; तीन गॅस सिलिंडर मोफत
Ladki Bahin Yojana | या महिलांना मिळणार लाभ..?
महाराष्ट्रातील रहिवासी असलेल्या महिलांना
विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या व निराधार महिलांना लाभ मिळणार
योजनेचा लाभ घेण्यासाठी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा कमी असावे
२१ ते ६० वर्ष वयोगटातील महिलांनाच लाभ घेता येणार
काय आहेत अटी..?
- अडीच लाखांपेक्षा जास्त कौटुंबिक उत्पन्न नसावे
- घरात कोणी Tax भरत नसावे
- कुटुंबात कोणी सरकारी नोकरीला असेल किंवा निवृत्तीवेतन घेत असेल त्या महिला अपात्र ठरतील.
- कुटुंबात ५ एकर पेक्षा अधिक जमीन असेल तर लाभ मिळणार नाही.
- कुटुंबातील सदस्यांकडे ४ चाकी वाहन (ट्रॅक्टर वगळता) असणाऱ्या महिला अपात्र (Ladki Bahin Yojana)
Budget Session | ‘हे’ शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना मोफत शिक्षण; काय आहे योजना..?
आवश्यक कागदपत्रे
आधारकार्ड, रेशनकार्ड, उत्पन्न दाखला, रहिवासी दाखला, बँक पासबुक, पासपोर्ट साईज फोटो ही कागदपत्रे आवश्यक असून, या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी योजनेच्या अर्ज पोर्टल किंवा मोबाइल अँपवर जाऊन नोंदणी करू शकतात किंवा आपल्या जवळील सेतू सुविधा केंद्रावर जाऊन आपण ऑनलाइन अर्ज करू शकतात. (Ladki Bahin Yojana)
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम