Budget Session | ‘हे’ शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना मोफत शिक्षण; काय आहे योजना..?

0
30
Budget Session
Budget Session

Budget Session :  आज राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादर केला असून, या अर्थसंकल्पात महिला, तरुण आणि मुलींसाठी अनेक महत्त्वपूर्ण योजनांची घोषणा करण्यात आल्या. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण, अन्नपूर्णा योजना यासोबतच अजित पवारांनी व्यवसायिक क्षेत्रात शिक्षण घेणाऱ्या मुलींसाठी १०० टक्के मोफत शिक्षणाची घोषणा केली आहे.

Ladki Bahin Yojna | महाराष्ट्रातील महिलांना मिळणार प्रतिमाह १,५०० रुपये; तीन गॅस सिलिंडर मोफत 

Budget Session | काय आहे योजना..?

व्यवसायिक क्षेत्रात मुलींची संख्या वाढवण्यासाठी सर्व व्यवसायिक क्षेत्रातील पदवी व पदविका शिक्षण घेणाऱ्या राज्यातील पात्र विद्यार्थिनींना १०० टक्के मोफत शिक्षणाची घोषणा करण्यात आली आहे.  या योजनेचा लाभ राज्यातील 2 लाख 5 हजार मुलींना होणार असून, शैक्षणिक वर्ष 2024-25 पासून या योजनेची अंमलबजावणी करण्यात येईल, असेही अजित पवारांनी जाहीर केले. यामुळे दरवर्षी 2000 कोटी रुपयांची तरतूद केली जाणार असल्याची माहितीही अजित पवारांनी दिली. आठ लाख रुपयांखलील उत्पन्न असणाऱ्या मुलींना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here