सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा | मविप्रच्या पिंपळगाव (वाखारी) येथील जनता विद्यालयात कृषी दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर प्राचार्य संगीता आहेर, पर्यवेक्षक राजेंद्र देसले, अशोक खैरनार, रवींद्र निकम, पृथ्वीराज सूर्यवंशी उपस्थित होते.
विद्यालयाचे सांस्कृतिक मंडळाचे प्रमुख रवींद्र निकम यांनी दरवर्षी एक जुलै रोजी महाराष्ट्रात कृषी दिन साजरा केला जातो. महाराष्ट्र हे कृषिप्रधान राज्य आहे. त्यामुळेच राज्याची अर्थव्यवस्था प्रामुख्याने कृषी क्षेत्रावर अवलंबून आहे. महाराष्ट्रात कृषी दिन महाराष्ट्राच्या हरित क्रांतीचे जनक, माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या स्मरणार्थ साजरा केला जातो.
कृषी क्षेत्रातील मोलाच्या योगदानाची आठवण म्हणून महाराष्ट्र सरकारने एक जुलैला कृषी दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला. राज्यभरात हा दिवस वेगवेगळ्या उपक्रमांनी साजरा केला जातो. याच दिवशी अन्नदाता शेतकऱ्यांचा सर्वत्र सन्मान केला जातो. सूत्रसंचालन पी. आर. निकम यांनी केले तर आभार अशोक खैरनार यांनी मानले. कार्यक्रमाचे नियोजन रवींद्र निकम, अशोक खैरनार यांनी केले. कार्यक्रमाचे सुंदर फलक लेखन रोहिणी आहेर हिने रेखाटले.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम