Deola | नैसर्गिक आवळ्या नाला वहिवाटीसाठी खुला; उपोषणकर्ते शेतकरी कुटुंबांना दिलासा

0
40
Deola
Deola

सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा |  मटाने येथील नैसर्गिक आवळ्या नाला शुक्रवारी (दि २८) रोजी तहसील प्रशासनाने वहिवाटीसाठी पोलीस बंदोबस्तात खुला करून दिल्याने उपोषणकर्त्यांनी समाधान व्यक्त केले आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, मटाने ता. देवळा येथील नैसर्गिक आवळ्या नाला हा वहिवाटीसाठी खुला करण्यात यावा, या मागणीसाठी येथील आबा आहेर, बापू आहेर, सजन आहेर, विठ्ठल आहेर आदी शेतकऱ्यांनी देवळा येथील जुन्या तहसील कार्यालयासमोर सहकुटूंब बैलगाडी व जनावरेसोबत घेऊन बुधवार (दि २७) रोजी लाक्षणिक उपोषण केले होते. भऊर फाटा ते वाजगांव रस्त्याला लागून पूर्व-पश्चिम असा शासकीय नैसर्गिक पुर्वापार आवळ्या नाला आहे.

Deola | खडकतळे शाळेत राजर्षी शाहू महाराज जयंती साजरी

सदर नाल्याने परिसरातील १५ ते २० शेतकरी कुटूंब वापर करीत आहेत. सदर नाल्या व्यतिरीक्त ह्या शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात जाण्यासाठी दुसरा पर्यायी रस्ता नसून शेत मालाची ने-आण करण्यासाठीही त्यांची मोठी गैरसोय निर्माण झाली आहे. परंतु गेल्या ३ वर्षापासून सामनेवाले यांनी सदरचा नाला बुजवून नाल्यातील वहिवाट बंद केल्याने त्यांना शेतमाल मुख्य रस्त्यावर आणता येत नसल्याने ह्या शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. यामुळे या शेतकऱ्यांनी नाला पूर्ववत खुला करावा या मागणीसाठी लाक्षणिक उपोषण केले होते. याची दखल घेऊन नायब तहसीलदार बबन अहिरराव यांनी याप्रकरणावर लागलीच दुसऱ्या दिवशी (दि २८) रोजी तातडीची सुनावणी करण्याचे लेखी आश्वासन दिल्याने उपोषण मागे घेण्यात आले.

Deola | महात्मा गांधी तंटामुक्ती समितीच्या तालुका अध्यक्षपदी विनोद देवरे

यानुसार तहसीलदार मिलिंद कुलकर्णी यांनी या केसचा न्यायालयात दावा सुरू असून, शुक्रवारी (दि २८) रोजी त्याबाबत सुनावणी घेऊन या प्रकरणाचा अंतिम निकाल होईपर्यंत सद्यस्थितीत नाला मोकळा करून वहिवाट सुरू करण्याबाबत संबंधितांनी सहमती दर्शवल्याने त्यानुसार तात्पुरत्या स्वरूपात नाला खुला करण्याचे आदेश दिल्याने ह्याच दिवशी वहिवाटीसाठी नाला खुला करून देण्यात आला. यामुळे संबंधित शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. यावेळी तहसीलदार मिलिंद कुलकर्णी, नायब तहसीलदार बबन अहिरराव, मंडळ अधिकारी के.टी ठाकरे, तलाठी नितीन धोंडगे आदींसह पोलीस कर्मचारी उपस्थित होते.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here