सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा | देवळा एज्युकेशन सोसायटी संचलित जनता विद्यालय खडकतळे शाळेत राजर्षी शाहू महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी मुख्याध्यापक डॉ सुनील आहेर यांनी राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन केले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उपसरपंच अजित भामरे, प्रियदर्शन पवार, संकेत पगार, साहिल पगार आदी उपस्थित होते.
यावेळी मुख्याध्यापक डॉ सुनिल आहेर म्हणाले राजर्षी शाहू महाराज हे दक्षिण महाराष्ट्रातील कोल्हापूर या संस्थानाचे अधिपती होते. एक संस्थान अधिपती यापेक्षा महाराष्ट्रातील बहुजन समाजाचे नेते ही त्यांची खरी ओळख होय. समाजसुधारणेच्या दृष्टीने त्यांनी जनहिताचे अनेक कायदे केले. अस्पृश्य व दुर्बल घटक यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. राज्याची आर्थिक स्थिती सुधारण्याकडे ही त्यांनी विशेष लक्ष पुरविले.
Deola | देवळा महाविद्यालयाच्या ‘बांधिलकी’ चा पुणे विद्यापीठाच्या वतीने गौरव
राजर्षी शाहू महाराज यांचे शैक्षणिक कार्यही अत्यंत महत्त्वाचे आहे.शैक्षणिक दृष्ट्या अनेक नानाविध गोष्टी त्यांनी केल्या त्यातीलच एक महत्त्वाचे पाऊल म्हणजे कोल्हापुरात विद्यार्थ्यांसाठी केलेली वसतिगृहाची स्थापना होय. राजर्षी शाहू महाराज हे खरे लोकशाहीवादी आणि समाज सुधारक मानले जातात. राजर्षी शाहू महाराज हे एक सक्षम राज्यकर्ते होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक पी.बी. विश्वास यांनी केले. आभार व्ही एस केदारे यांनी मानले. यावेळी विद्यालयाचे सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम