सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा | कॅनरा रोबिको म्युच्युअल फंड यांच्या सौजन्याने जनता विद्यालय व ज्यूनिअर कॉलेज अजमीर सौंदाणे येथे गरीब व होतकरू 50 विद्यार्थ्यांना सायकलीचे वाटप करण्यात आले. सचिनराव बाबुलाल मथुरे व त्यांच्या कुटुंबाकडून शाळेतील गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बागलाण एज्युकेशन सोसायटीचे व्हा. चेअरमन जिभाऊ सोनवणे हे होते. सोनवणे यांनी आजच्या युगात दातृत्व भाव कमी होत चालले असतानाही मथुरे कुटुंबाने दातृत्वाचा वसा चालू ठेवला आहे.
Chandwad | चांदवड येथील शासकीय आयटीआय मध्ये युवा दिन साजरा
याप्रसंगी अजमीर सौंदाणे येथील सरपंच धनंजय पवार यांनी गरीब विद्यार्थ्यांना मदत केल्यामुळे त्यांना शिक्षणामध्ये पुढे जाण्यास प्रोत्साहन मिळते अशी भावना व्यक्त केली. यावेळी प्राचार्य आर. टी. सूर्यवंशी यांनी सर्व प्रमुख पाहुण्यांचे शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. सामाजिक कार्यकर्ते किरण पाटोळे यांच्या इच्छेने आपण पण गावाचे काहीतरी देणं लागतो म्हणून हा सर्व कार्यक्रम घडवून आणला. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून श्रीधर कोठावदे, रमेश देवरे, साहेबराव सोनवणे, राहुल सोनवणे, जयप्रकाश सोनवणे, सामाजिक कार्यकर्ते प्रकाश मगर, मंगेश पवार, अतुल पवार आदींसह गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेतील सर्व शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम