Monsoon Session : कालच अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादर केला. यात सर्वसामान्यांवर अनेक योजना आणि घोषणांचा पाऊस विद्यमान सरकारकडून पाडण्यात आला. यावर विरोधकांनी सडकून टिका केली असून, यावरुन आरोप प्रत्यारोप सुरू असतानाच आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही के मोठी घोषणा केली आहे.
आज विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक (MLA Pratap Sarnaik) यांनी तिर्थदर्शनासाठी योजनेची मागणी केली होती. यावर मुख्यमंत्री शिंदे (CM Eknath Shinde) यांनी बोलताना ‘मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना’ (Chief Minister Pilgrimage Scheme) सुरु करणार असल्याचे जाहीर केले. इच्छा असूनही जाता येत नाही, अशा ज्येष्ठ नागरिकांसाठी ही योजना सुरू करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. महाराष्ट्र संतांची भुमी असून, आता राज्यात पांडुरंगाची वारीही सुरु आहे. यावर्षी आपण पहिल्यांदाच प्रत्येक दिंडीला २० हजार रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतल्याचे मुख्यमंत्री शिंदेंनी अधोरेखित केले.
Maharashtra Goverment | महिला, शेतकरी, तरूणांवर घोषणांचा पाऊस; अर्थसंकल्पातील टॉप १० घोषणा
Pilgrimage Scheme | ५ ते १० हजार लोकांना तीर्थ दर्शन घडवले जाईल
“जे जेष्ठ नागरिक तीर्थ क्षेत्रांना जाऊन देवांचे दर्शन घेऊ इच्छितात. मात्र, त्यांच्यासाठी तीर्थ यात्रा परवडणारी नाही. तर, त्यांनाही याचा लाभ घेता यावा. यासाठी ‘मुख्यमंत्री देवदर्शन तीर्थदर्शन’ अशी योजना सुरु करण्याची मागणी शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक यांच्याकडून लक्षवेधी मांडताना करण्यात आली होती. त्यावर ‘मुख्यमंत्री देवदर्शन तीर्थ दर्शन योजना’ आम्ही आज सुरु करत असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले. (Pilgrimage Scheme)
यासाठी धोरण ठरवून शासनाच्या माध्यमातून ५ ते १० हजार लोकांना तीर्थदर्शन यात्रा घडवली जाणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. तर, राज्यातील हिंदू, ईसाई, शीख, बौद्ध, जैन, ख्रिश्चन या सर्वांच्या सर्व धर्मीय धार्मिक स्थळांचा यात समावेश असून, हज यात्रा आधीपासून असल्याचेही यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
Budget Session | ‘हे’ शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना मोफत शिक्षण; काय आहे योजना..?
लाडक्या भावाबाबतही निर्णय घेतला..?
दरम्यान, या योजनेबाबत बोलताना मुख्यमंत्र्यांनी याबाबत नियम, दरवर्षी नियमावली करुन आपण किती लोकांना पाठवू शकतो हे आणि बाय रोटेशनप्रमाणे ही योजना सुलभपणे काशी राबवता येईल हे ठरवू असेही सांगितले. काही जणांची इच्छा असते. मात्र ते लोक यात्रेला जाऊ शकत नाही. अशा ज्येष्ठ नागरिकांसाठी ही योजना लागू करु असेही यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. या योजनेमुळे सरकारला आशिर्वाद मिळेल आणि आम्ही नवनवीन निर्णय घेऊ. लाडकी बहिण ही योजनादेखील आपण सुरु केली आहे. यावरुन काही लोक म्हणाले की “लाडका भाऊ कुठे गेला..?”. तर आम्ही लाडक्या भावाबाबतही निर्णय घेतल्याचेही शिंदे म्हणाले. (Pilgrimage Scheme)
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम