Nashik Lok Sabha Result | नाशिक लोकसभेत शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत रंगली असून, येथे सुरुवातीपासूनच ठाकरेंच्या शिवसेनेचे राजभाऊ वाजे हे आघाडीवर आहेत. सुरुवातीला तिरंगी असलेली ही लढत आता एकतर्फी असल्याचे दिसत आहे. अगदी सुरुवातीपासूनच राजाभाऊ वाजे हे आघाडीवर आहेत. मोठ्या संख्येने राजाभाऊ वाजे हे आघाडीवर आहेत. राज्यात महाविकास आघाडीला पसंती मिळाली असून, महायुतीला मोठा धक्का बसला आहे.
ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी गुलाल उधळला
राज्यात ज्या ज्या ठिकाणी ठाकरे विरुद्ध शिंदे अशी लढत झाली. तिथे ठाकरे गटाचीच सरशी झाल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान, राजाभाऊ वाजे यांच्या समर्थक आणि कार्यकर्त्यांनी आतापासूनच मोठा जल्लोष करायला सुरुवात केली असून, नाशिकमध्ये ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी गुलाल उधळला आहे. अगदी दोन दिवसांपासूनच हेमंत गोडसे यांच्या समर्थकांनी सेलिब्रेशनची तयारी केली असून, त्यांना गोडसेंच्या हॅटट्रिकचा फुल्ल कॉन्फिडन्स होता. मात्र, त्यांचा हा आत्मविश्वास कुठेतरी डगमगताना दिसत असून, हेमंत गोडसे अता परंभवांच्या छायेत असल्याचे दिसत आहे.(Nashik Lok Sabha Result)
Nashik Lok Sabha Result | गोडसेंना ‘या’ बाबींचा फटका
उमेदवारी उशीरा जाहीर झाली. महायुतीचा अंतर्गत वाद याचा मोठा फटका हेमंत गोडसेंना बसल्याचे यामुळे स्पष्ट झाले आहे. भाजाचा सुरुवातीपासूनच हेमंत गोडसेंच्या उमेदवारीला विरोध होता. मात्र, एकनाथ शिंदे आणि हेमंत गोडसे यांच्या आग्रहामुळे ही उमेदवारीची माळ त्यांच्या गळ्यात घालण्यात आली. तर, आता भाजपचा निर्णय हा बरोबरच होता की काय..? हा प्रश्न यामुळे उपस्थित होत आहे. (Nashik Lok Sabha Result)
Loksabha Election Result | राज्यातील मतदारांचा महायुतीला ठेंगा; महाविकास आघाडी मोठ्या फरकाने आघाडीवर
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम