Share Market | ४ जून रोजी लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीचे प्रक्रिया सुरू आहे. आतापर्यंतच्या आकडेवारी नुसार एनडीए २८९ जागांनी आघाडीवर तर इंडिया आघाडी २३५ जागांनी आघाडीवर आहे. अशातच शेअर बाजारात मोठा भूकंप होत असल्याचे दिसत आहे. तब्बल ६ हजार अंकांनी सेन्सेक्स खाली आपटले आहेत.
Share Market | ५,५०० अंकांनी घसरण
दरम्यान, जसजशी इकडे निकालाची आकडेवारी बदलताना दिसत आहे. तसतशी इकडे शेअर बाजारातही मोठी घसरण होताना दिसत आहे. सकाळी १३०० अंकांपासून सुरू झालेली ही घसरण आता ५,५०० अंकांवर पोहोचली असून, शेअर बाजारात आता तब्बल ५,५०० सेन्सेक्सने (sensex) घसरण घसरण झालीचे पहायला मिळत आहे. (Share Market)
Share Market | एका गुंतवणूकदाराने 90 दिवसांत कमावले 25 कोटी
शेअर बाजारात मोठा भूकंप
निवणुकीच्या आकड्यांचा परिणाम हा शेअर बाजारात होत असून, सध्या देशात एनडीए २८९ जागांनी आघाडीवर तर इंडिया आघाडी २३५ जागांवर आघाडीवर आहे. हा आतापर्यंतचा शेअर बाजारातील मोठा धक्का मानला जात असून, शेअर बाजारात मोठा भूकंप आल्याचे हे चित्र आहे. (Share Market)
देशातील लोकसभा निवडणुकीचे अपेक्षित असलेले निकाल न आल्याने भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण होताना दिसत आहे. आज सकाळपासून मतमोजणी सत्र सुरू होताच शेअर बाजार गडगडायला सुरुवात झाली होती. दरम्यान, याचा परिणाम मोठ्या प्रमाणावर शेअर बाजारावर होत आहे. आता दुपारपर्यंत हाच शेअर बाजार कोसळल्याचे दिसत आहे. शेअर बाजाराचे सेन्सेक्स व निफ्टी हे दोन्ही निर्देशांक अभूतपूर्व आपटले आहेत. तर, एका दिवसातच एवढ्या मोठ्या प्रमाणात घसरण झाल्याने गुंतवणूकदारांचे आतापर्यंत तब्बल कोट्यवधी रुपये बुडाले आहेत.
Share Market: सेन्सेक्स किंचित घसरला, निफ्टी किंचित वर बंद झाला
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम