Mahayuti Seat Sharing | आगामी लोकसभा निवडणुका या आता अगदी तोंडावर येऊन ठेपल्या आहेत. मात्र, अजूनही दोन्ही गोटात जागावाटपाचा तिढा हा काही सुटलेला नाही. अजूनही काही जागांवरून दोन्हींकडे रस्सीखेच सुरू आहे. दरम्यान, महायुतीतदेखील काही जागांवरून वाद सुरू आहे. यात संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे ते नाशिकचा महायुतीचा उमेदवार कोण असेल याकडे. कारण उदयनराजेंना उमेदवारी दिल्यानंतर नाशिकची जागा ही राष्ट्रवादी अजित पवारांकडे आली असून, येथे आता छगन भुजबळ हेच उमेदवार असतील. हे जवळपास निश्चित झाले असल्याची माहिती समोर आली आहे.(Mahayuti Seat Sharing)
जागावाटपावरून महायुतीतील अनेक नेते हे नाराज असून, काल तिन्ही पक्षांच्या प्रमुखांनी नाराज नेत्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, यामुळे रात्री मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर एकामागोमाग एक अशा अनेक राजकीय घडामोडी झाल्या. यात काहींची नाराजी दूर झाली तर, काही अजूनही आपल्या मागण्यांवर ठाम आहेत.
Mahayuti Sarkar | मनसे-भाजप युतीच्या हालचाली; मनसेला इतक्या जागा देणार..?
काल वर्षा बंगल्यावर रात्री साडेआठ पासून बैठका सुरू होत्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवारांची एक राज्यस्तरीय पहिली बैठक पार पडली आहे. ही बैठक रात्री १ वाजता संपली. तर, अधिक माहितीनुसार या बैठकीत जागावाटपावर अखेरचा शिक्कामोर्तब झाला आहे. मात्र, यानंतरही वर्षावर अनेक राजकीय खलबतं घडामोडी देखील घडल्याचे पाहायला मिळाले. (Mahayuti Seat Sharing)
Mahayuti Seat Sharing | रात्री ‘वर्षा’वर काय काय घडलं?
- काल रात्री 8.30 च्या सुमारास हजारो कार्यकर्त्यांसह नाशिकचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे हे वर्षा बंगल्यावर दाखल झाले. हेमंत गोडसे आणि मुख्यमंत्र्यांमध्ये पहिली बैठक पार पडली. यात गोडसेंची समजूत काढण्याचा प्रयत्न झाला. व त्यांनाच उमेदवारी मिळेल असे सांगण्यात आले आहे.
- यानंतर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे आणि रायगडमधील नाराज आमदार यांच्यासोबत बैठक पार पडली. या बैठकीत आमदारांना तटकरेंना समर्थन देण्याचा सल्ला देण्यात आला.
- सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाबाबत उदय सामंत आणि मुख्यमंत्री यांच्यात चर्चा झाली. किरण सामंत यांना उमेदवारी देण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली. (Mahayuti Seat Sharing)
- यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी विजय शिवतारे यांची समजूत काढली. यावेळी येथे अजित पवारही उपस्थित होते. अजित पवार आणि शिवतारे यांची चर्चा झाली.
Nashik Loksabha | दोघांचे भांडण तिसऱ्याचा लाभ; नाशिकमधून भुजबळांना उमेदवारी
- अमरावतीच्या जागेवर नवनीत राणा यांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर करण्यात आल्यानंतर शिंदे गटाचे नेते आनंदराव अडसूळ हे नाराज असून, अडसुळांचीही समजूत काढण्याचा प्रयत्न शिंदेंनी केला. मात्र, यावेळी सकारात्मक चर्चा झाली नाही. त्यामुळे त्यांचे चिरंजीव अभिजीत अडसूळ हे नवनीत राणा यांच्या विरोधात अपक्ष निवडणूक लढवू शकतात.(Mahayuti Seat Sharing)
- भावना गवळी यांना डावलण्याची शक्यता असल्याने त्याही आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह वर्षा बंगल्यावर दाखल आल्या होत्या. यावेळी मुख्यमंत्र्यांसोबत त्यांची सकारात्मक चर्चा झाली आहे.
- या सर्व बैठकांनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याच राज्यस्तरीय बैठक झाली असून, यात जागा वाटपासंदर्भात अंतिम चर्चा झाल्याची माहिती आहे. तसेच आज किंवा उद्या महायुतीच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर होऊ शकते. मात्र, अद्यापही ठाणे लोकसभेवर तोडगा व निघाल्याची माहिती समोर आली आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम