Udayanraje Bhosale | सातारा लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे विद्यमान राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले हे सताऱ्यातून लोकसभेची निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. मात्र, दुसऱ्या यादितही त्यांचे नाव न आल्याने त्यांनी आणि त्यांच्या समर्थकांनी नाराजी व्यक्त केली होती. दरम्यान, आता उदयनराजेंची उमेदवारीसाठी धावपळ सुरू असल्याचे दिसत आहे.(Udayanraje Bhosale)
महायुतीत राष्ट्रवादी अजित पवार गट हा सातारा लोकसभा मतदारसंघासाठी आग्रही आहे. त्यामुळे आता उदयनराजे हे थेट राजधानी दिल्ली येथे पोहचले असून, ते केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार असल्याची माहिती आहे. याचे कारण म्हणजे उदयनराजेंनी राष्ट्रवादीच्या घड्याळावर निवडणूक लढण्यास नकार दिला असल्याचीही माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता उदयनराजेंच्या उमेदवारीचा निकाल हा थेट दिल्लीत होण्याची शक्यता आहे.
BJP loksabha Candidate | भाजपाची दुसरी यादी जाहीर; भारती पवार आणि सुभाष भामरे यांनाच पुन्हा उमेदवारी
सातारा लोकसभा मतदारसंघावरून महायुतीत राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये रस्सीखेच सुरू असून, दोन्ही पक्षांकडून या जागेवर दावा केला जात आहे. त्यामुळे सातारा लोकसभा मतदारसंघाच्या जागेवरून महायुतीत तिढा कायम आहे. त्यामुळे उदयनराजेंची उमेदवारी देखील धोक्यात असल्याची चिन्हे आहेत. त्यामुळे आता तिकीटासाठी उदयनराजे धावपळ करत थेट दिल्लीला रवाना झाले होते. काल रात्री ते अमित शाह यांच्या भेटीला पोहचले. मात्र, रात्री त्यांची भेट होऊ न शकल्याने आज भेट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा तिढा आता थेट दिल्लीच्या दरबारीच सुटण्याची शक्यता आहे. (Udayanraje Bhosale)
Udayanraje Bhosale | उदयनराजेंचा घड्याळाला नकार
सातारा लोकसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादी कॉंग्रेसचा बालेकिल्ला आयहे. येथे शरद पवारांचे घनिष्ट मित्र श्रीनिवास पाटील हे खासदार आहेत. यावेळी श्रीनिवास पाटील यांच्याऐवजी त्यांचे चिरंजीव सारंग परील यांना शरद पवार गटाकडून उमेदवारी दिली जाण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे या जागेसाठी अजित पवार गट आग्रही आहे. मात्र, या जागेवरून उदयनराजे हेदेखील निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. दरम्यान, त्यांना भाजपकडूनच उमेदवारी हवी असल्याने त्यांनी घड्याळ्याच्या चिन्हावर निवडणूक लढवण्यास नकार दिला असल्याची माहिती समोर आली आहे. (Udayanraje Bhosale)
Loksabha Election | आमदारांना खसदारकीची संधी; काँग्रेसचे ‘हे’ उमेदवार निश्चित
फडणवीसांकडूनही तोडगा निघाला नाही
भाजपने गेल्या काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रातील उमेदवारांची यादी जाहीर केली. मात्र, या यादीत उदयनराजे यांचे नाव नसल्याने त्यांच्या समर्थकांनी नाराजी व्यक्त केली होती. यानंतर मंगळवारी रात्री उशिरा उदयनराजेंनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यांच्यात तब्बल २ तास चर्चा झाली. मात्र, या बैठकीत देखील त्यांच्या उमेदवारीवर तोडगा न निघाल्याने आता उदयनराजेंनी थेट दिल्ली गाठली आहे. (Udayanraje Bhosale)
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम