Ram Temple | भाटगाव हायस्कुलमध्ये दरवळला शबरीमातेच्या बोरांचा सुगंध

0
22
Ram Temple
Ram Temple

Ram Temple | विकी गवळी – चांदवड : शिक्षण मंडळ भगूर संस्था संचलित नूतन माध्यमिक विद्यालय भाटगाव ता. चांदवड येथील कलाशिक्षक देव हिरे आणि विद्यार्थ्यांनी बोरांचा वापर करत श्रीरामाची प्रतिकृती साकारत जय श्री रामचा ‘जय घोष’ केला आहे.

Gold Silver Rate Today | सोने-चांदीची ‘गूड न्यूज’; असे आहेत आजचे दर

कोट्यवधी भारतीयांचं श्रद्धास्थान श्रीरामाच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा येत्या काही दिवसात दिमाखदार, पवित्र आणि धार्मिक वातावरणात पार पडणार आहे. यानिमित्त ठिकठिकाणी प्रभू श्रीरामाला विविध प्रकारे अभिवादन केलं जात आहे.

वाल्मिकी ऋषींच्या रामायणातील रामभक्त शबरीमातेची रामभक्ती आणि उष्टी बोरे ही गोष्ट सर्वश्रृत आहे. दरम्यान, बोरांपासून श्रीरामाची प्रतिमा तयार करण्याची संकल्पना कलाशिक्षक देव हिरे यांना सुचली. आयोध्या येथे प्रभू श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे औचित्य साधून देव हिरे तसेच विद्यार्थ्यांनी  ८ बाय ८ फूट आकारात प्रभू श्रीरामांची ही कलाकृती साकारली आहे.

Horoscope 18 January | ‘या’ लोकांवर आज मोठी जबाबदारी; वाचा आजचे राशीभविष्य

Ram Temple | तब्बल १६ तास कला अन् भक्तीचा संगम

या प्रयोगासाठी साठी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना बोरं आणण्याचे आवाहन मा. मुख्याध्यापक श्री.विजय सानप आणि पर्यवेक्षक श्री. भीमराव बोढारे यांनी केले. तसेच अनेक विद्यार्थ्यांनी बोरं जमा केलीत. विद्यार्थ्यांचा उत्साह पाहून कलाशिक्षक देव हिरे यांनी त्यांनाही या उपक्रमात सहभागी करून घेत त्यांना प्रेरीत केलं. तीन कॅरेट बोरांच्या रंगाप्रमाणे वर्गीकरण करत तब्बल १६ तास कला अन् भक्तीचा संगमच ही कलाकृती ठरली. यासाठी तीन कॅरेट बोरांचा वापर करण्यात आला.

कलाकृती पूर्ण झाली तेव्हा बोरांचा अन् श्रीराम भक्तीचा दरवळच भाटगाव परिसरात पसरला होता. बोरांचा वापर करत पर्यावरणपूरक पद्धतीने साकारलेली श्री रामाची ही कलाकृती जगातील पहिलाच प्रयोग ठरला आहे. ही नाविन्यपूर्ण संकल्पना व कलाकृती बघण्यासाठी पंचकृषितील विद्यार्थी, पालक यांची गर्दी होत आहे.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here