Gold Rate Today | गेल्या आठवड्यापासून सोने -चांदीच्या किंमतींमध्ये लगातार घसरण सुरू आहे. गेल्या वर्षभरात दर जितके सरसर वर चढले होते. आता या वर्षात ते तितकेच सरसर खाली उतरताना दिसत आहे. मात्र, गेल्या वशत दरांचा आलेख वर असल्यामुळे जे ग्राहक हिरमुसले होते. त्यांना आता मोठा दिलासा मिळाला आहे. तसेच किंमतींमध्ये झालेल्या या घसरणीमुळे आता सामान्य ग्राहकांची पाऊले ही ज्वेलर्सच्या दुकानांच्या दिशेने वळली आहे.
गेल्या महिन्यात दोन्ही धातू हे सामान्य ग्राहकांच्या आटोक्याबाहेर होते. मात्र, आता या वर्षाच्या सुरुवातीच्या दोन्ही आठवड्यांमध्ये दरांमध्ये आपटी सुरू असून, यात आणखी घसरण होण्याची शक्यता आहे. या वर्षाचे पहिले दोन दिवस दर वाढलेले होते. मात्र, त्यानंतर दोन्ही धातूंच्या किंमती आपटायला सुरुवात झाली. किरकोळ वाढ वगळता ती अजूनही सुरूच आहे. याकाळात काही किरकोळ वाढ झाली असेल, तर लगेच दुसऱ्या दिवशी त्यापेक्षा दुप्पटीने दर घसरले आहेत. बघा असे आहेत आजचे सोने-चांदीचे दर… (Gold Rate Today)
Gold Rate Today | सोन्याच्या दरांची घसरगुंडी
गेल्या ३ जानेवारीपासून सोन्याच्या दरांमध्ये सलग घसरण होत आहे. मागील १० दिवसांत किंमतींमध्ये इतकी आणि असही घसरण झाली आहे.
४ जानेवारी – ४४० रुपयांची घसरण
५ जानेवारी – १३० रुपयांची घसरण
६ जानेवारी – २० रुपयांची वाढ
७ जानेवारी – भाव अपडेट झाले नाहीत.
८ जानेवारी – २२० रुपयांची घसरण
९ जानेवारी – १०० रुपयांची घसरण
१० जानेवारी – भाव अपडेट झाले नाहीत.
११ जानेवारी – १०० रुपयांची घसरण
तर, आज गुडरिटर्न्सनुसार २४ कॅरेट प्रति १० ग्रॅम सोन्याचे दर हे ६३,१०० असे आहेत आणि २२ कॅरेट प्रति १० ग्रॅम सोने ५७,७५० रुपये असे आहे. (Gold Rate Today)
Gold Silver Rate | आजच सोने खरेदी करा; असे आहेत आजचे दर
चांदी ३,१०० रुपयांनी घसरली
गेल्या वर्षात सोन्यासह चांदिनेही उच्चांक गाठला होता. गुंतवणूकदारांना चांदिने चांगला परतावा दिला आहे. मात्र, या वर्षात चांदीच्या दरांमध्येही मोठी घसरण होताना दिसत आहे. या वर्षात चांदिने ग्राहकांना दिलासा दिला. ३ जानेवारी रोजी ३०० रुपयांनी चांदीचे दर खाली आली. ४ जानेवारी रोजी भाव २००० रुपयांनी खाली आले. तर, ८ जानेवारीला दर पुन्हा २०० रुपयांनी खाली आले. तर, १० जानेवारी रोजी किंमती ६०० रुपयांनी घसरल्या. दरम्यान, गुडरिटर्न्सनुसार आज एक किलो चांदीच दर हे ७६,००० रुपये असे आहेत. (Gold Rate Today)
असे आहेत १४ ते २४ कॅरेटचे दर
इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार, आज सोने आणि चांदीचे दर हे आणखी खाली आले आहेत. प्रति कॅरेट नुसार असे आहेत आजचे दर…
२४ कॅरेट (प्रति १० ग्रॅम) सोने – ६२,२६२ रुपये,
२३ कॅरेट (प्रति १० ग्रॅम) सोने – ६२,०१३ रुपये,
२२ कॅरेट (प्रति १० ग्रॅम) सोने – ५७,०३२ रुपये,
१८ कॅरेट (प्रति १० ग्रॅम) सोने – ४६,६९७ रुपये,
१४ कॅरेट (प्रति १० ग्रॅम) सोने – ३६,४२३ रुपये असे आहेत.
तर, एक किलो चांदीचे आजचे दर हे ७१,५३२ रुपये असे आहे. (Gold Rate Today)
Gold Rate Today | सोने घसरले तर चांदीची नांदी; असे आहेत सोने-चांदीचे दर
(टीप- वरील माहिती ‘द पॉइंट नाऊ’ फक्त माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत असून, याद्वारे आम्ही कुठलाही दावा करत नाही. वरील दर हे सूचक असून अचूक दरांसाठी स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधावा.)
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम