LPG Price | सर्वसामान्यांच्या खिशाला चटका!; सिलिंडरच्या दरात वाढ,

0
28

LPG Price | देशात पाच राज्यांतील विधानसभा निवडणुका ह्या संपलेल्या असतानाच महागाईचा आणखी एक मोठा धक्का सर्वसामान्यांना बसला आहे. एलपीजी गॅस सिलिंडर हे आजपासून म्हणजेच १ डिसेंबर २०२३ पासून, वर्षाच्या शेवटच्या महिन्याच्या पहिल्या तारखेपासूनच महागले आहेत. दरम्यान, प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला देशभरात एलपीजी गॅस सिलिंडरच्या किंमती सुधारित केल्या जात असतात. तसेच, आजही ह्या एलपीजी गॅस सिलिंडरच्या किंमती अपडेट केलेल्या असून डिसेंबरच्या पहिल्याच दिवशी ग्राहकांना महागाईचा धक्का बसला आहे.(LPG Price)

एलपीजी गॅस सिलिंडर झाले महाग

देशातील तेल विपणन कंपन्यांनी १९ किलो व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किंमतींमध्ये मोठी वाढ केली आहे. यापूर्वी १६ नोव्हेंबर रोजी व्यावसायिक गॅसच्या किंमती ह्या कमी करण्यात आल्या होत्या. घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतींमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नव्हता. तरी, १९ किलोच्या गॅस सिलिंडरच्या वाढलेल्या किंमतींमुळे बाहेर खाणाऱ्यांना जास्त पैसे मोजावे लागणार आहे.(LPG Gas Cylinder Price)

Spiritual news | शनिवारी करा ‘या’ मंत्राचा जप, साडेसातीकाळात होतील फायदे!

मतदान झाले अन् महागाई वाढली

राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा तसेच मिझोराम या राज्यांमध्ये मतदान हे झालेले असून, आता ३ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किंमतींमध्ये करण्यात आलेल्या ह्या दरवाढीचा ग्राहकांना मोठा धक्का बसला आहे. यापूर्वी १ ऑक्टोबर व १ नोव्हेंबर रोजी व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किंमतींत वाढ करण्यात आलेली होती. तर, १ सप्टेंबर रोजी ह्या दरांत मोठी कपातही जाहीर करण्यात आली होती. मागील महिन्यातही व्यावसायिक सिलिंडरच्या किंमती १०३ रुपयांनी वाढवण्यात आलेल्या होत्या.(LPG Price)

घरगुती LPG दरात ग्राहकांना दिलासा

दरम्यान, एकीकडे व्यावसायिक सिलिंडरच्या किंमती वाढवण्यात आलेल्या असताना, घरगुती ग्राहकांना मात्र, दिलासा कायम आहे. तेल कंपन्यांनी १४.२ किलो म्हणजे घरगुती कामासाठी वापरल्या जाणाऱ्या LPG गॅस सिलिंडरच्या किंमतीत कोणताही बदल केलेला नसून, ३० ऑगस्टपासून घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीत कुठलाही बदल झालेला नाही. यादरम्यान, विमानात वापरल्या जाणार्‍या इंधनाच्या म्हणजेच एटीएफच्या किंमतीतही आजपासून काही बदल करण्यात आलेले आहेत. (LPG Price)

Gold Silver Rate | सोन्याची माघार; तर चांदी तेजीतच

महानगरांत अश्या आहेत व्यावसायिक सिलिंडरच्या किंमती

१. देशाची राजधानी दिल्लीत व्यावसायिक सिलिंडरची किंमती ह्या नोव्हेंबरच्या १,७७५.५० रुपयांच्या तुलनेत दरवाढीसह १,७९६.५० रुपयांवर पोहोचल्या आहेत.

२. तसेच मुंबईत व्यावसायिक सिलिंडरची किंमत ही वाढून १,७४९ रुपये इतकी झालेली आहे. जी मागील महिन्यात १,७२८ रुपये अशी होती.

३. कोलकातामध्ये व्यावसायिक सिलिंडरची किंमत ही १,९०८ रुपये अशी आहे.

४. तर, चेन्नईमध्ये व्यावसायिक सिलिंडरची किंमत ही १,९६. ५० रुपये इतकी आहे.(LPG Price)

Farmer Subsidy scheme | पिकांवरील कीडनियंत्रणासाठी आता मिळणार अनुदान


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here