Skip to content

Gold Silver Rate | सोन्याची माघार; तर चांदी तेजीतच


Gold Silver Rate |  सोने-चांदीने मागील दोन दिवसांत किंमतीचा रेकॉर्ड मोडलेला आहे. ह्या किंमती सध्या गगनाला भिडलेल्या आहेत. इंडियन बुलियन्स ज्वेलर्स असोसिएशननुसार, सोन्याने मोठी मुसंडी मारली असून, सोने-चांदीने किंमतीचा नवा उच्चांक गाठलेला आहे. यापूर्वीचे सर्व रेकॉर्ड मोडीत काढत सोने-चांदीने नाव रेकॉर्ड रचला आहे. दिवाळीपासूनच ह्या मौल्यवान धातूंनी उसळी घेतली होती.

ह्या दरवाढीला आजच्या ट्रेडमध्ये किंचित ब्रेक लागला आहे. सोने-चांदी हे सर्वकालीन उच्चांकावर पोहचले आहेत. ४ मे २०२०३ रोजी २४ कॅरेट प्रति १० ग्रॅम सोन्याची किंमत ही ६१,६४६ रुपये इतकी होती. ही त्यावेळची उच्चांकी किंमत होती. मंगळवार व बुधवार रोजी ह्या मौल्यवान धातूंनी नवीन रेकॉर्ड तयार केला आहे. मंगळवार रोजी २४ कॅरेट प्रति १० ग्रॅम  सोन्याचा दर हा ६१,९१३ रुपये असा होता. तर, बुधवारी सोन्याचा दर हा ६२,६२९ रुपयांवर पोहचला होता.दरम्यान, गुरुवारी यात किंचित घसरण झाली होती.(Gold Silver Rate)

Farmer Subsidy scheme | पिकांवरील कीडनियंत्रणासाठी आता मिळणार अनुदान

सोन्याची घसरण

दिवाळीपासून सोन्याच्या दरवाढीचे सत्र हे सुरूच आहे. ह्या आठवड्यात सोन्याने आतापर्यंतचे सर्वच रेकॉर्ड मोडले नाही तर नवीन विक्रमही रचला आहे. ह्या आठवड्यात सोमवार (दि. 27 नोव्हेंबर) रोजी सोने हे २५० रुपयांनी महागले होते. तर, २९ नोव्हेंबर रोजी भाव ८२० रुपयांनी वाढे होते. आणि ३० नोव्हेंबर रोजी दरांत ६५० रुपयांची घसरण झाली. गुडरिटर्न्सनुसार, आता २२ कॅरेट प्रति १० ग्रॅम सोने हे ५७,६५० रुपये असून, २४ कॅरेट प्रति १० ग्रॅम सोन्याचे दर हे  ६२,८८० रुपये असे आहेत. (Gold Silver Rate)

चांदीही झळाळली 

मागील दोन आठवड्यात चांदीने मोठी मुसंडी घेतली आहे. मागील आठवड्यात १,४०० रुपयांनी किंमती वाढल्या होत्या. तर, २७ नोव्हेंबर रोजी किंमती १००० रुपयांनी वाढल्या. तर, २९ नोव्हेंबर रोजी दरांत ७०० रुपयांनी वाढ झाली होती.  गुडरिटर्न्सनुसार, आज एक किलो चांदीचा दर हा ७९,२०० रुपये असा आहे. (Gold Silver Rate)

Crime news | प्रेयसीने फोन चेक केला; सापडले मुलींचे १३,००० नग्न फोटो

असा आहे १४ ते २४ कॅरेटचा भाव..? 

इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार, आज सोन्यात किंचित घसरण झाली. २१-२५ रुपयांनी किंमती घसरल्या आहेत.२४ कॅरेट प्रति १० ग्रॅम सोने हे ६२,६०७ रुपये असून, २३ कॅरेट सोने हे ६२,३५७ रुपये असे आहेत. २२ कॅरेट प्रति १० ग्रॅम सोने हे ५७,३४८ रुपयांवर पोहोचले आहे. तर, १८ कॅरेट ४,९९५ रुपये आणि १४ कॅरेट प्रति १० ग्रॅम सोने हे ३६,६२५ रुपयांवर पोहचले आहे. तसेच, एक किलो चांदीचा आजचा दर हा ७५,९३४ रुपये झाला आहे.  (Gold Silver Rate)

(वरील सोन्याचे दर सूचक आहेत तसेच त्यात जीएसटी, टीसीएस व इतर करांचा समावेश नाही. अचूक दरांसाठी स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधावा.)

Info-Tech News | कार खरेदी करताय? 2024 मध्ये लॉन्च होताय या जबरदस्त कार


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!