Crime news | प्रेयसीने फोन चेक केला; सापडले मुलींचे १३,००० नग्न फोटो

0
2
Mumbai News
Mumbai News

Crime news |   बीपीओ ह्या कंपनीत काम करणाऱ्या एका महिला कर्मचाऱ्याने तिच्या प्रियकराच्या मोबाईलमध्ये तिचे तसेच इतर महिलांचे सुमारे १३,००० न्यूड फोटो असल्याचा गंभीर आरोप केला आहे. या महिलेने दावा केला की, जेव्हा तिने तिच्या प्रियकराच्या मोबाईलमधील गॅलरी ओपन केली व त्यात तिचे व इतर मैत्रिणींचे नग्नावस्थेतील फोटो तिला सापडले. तिने कंपनीच्या लीगल टीमलाही याबद्दलची माहिती दिली. त्यानंतर सायबर क्राईम पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

‘टाईम्स ऑफ इंडिया’च्या वृत्तानुसार, बेलंदूर येथील बीपीओच्या कायदेशीर विभाग प्रमुखाने २३ नोव्हेंबर रोजी २५ वर्षीय आदित्य संतोष याच्याविरुद्ध सायबर गुन्ह्याची तक्रार दाखल केली व याप्रकरणी कारवाईची मागणी केली आहे. आरोपी संतोष व त्याची महिला सहकारी ही चार महिन्यांपासून रिलेशनमध्ये होते. तिच्यासोबत घालवलेले काही जिव्हाळ्याचे क्षणही आरोपीने ह्या फोनमध्ये रेकॉर्ड केलेले होते.

Info-Tech News | कार खरेदी करताय? 2024 मध्ये लॉन्च होताय या जबरदस्त कार

प्रियकरासोबतचे नाते तोडले

मोबाईलमध्ये खासगी क्षणांचे  फोटो पाहिल्यानंतर प्रेयसीने फोटो डिलीट करण्याचे ठरवले. पण, गॅलरीतील इतर फोटो पाहिल्यानंतर तिला धक्काच बसला. यानंतर या मुलीने प्रियकर संतोषसोबतचे संबंध तोडले व २० नोव्हेंबर रोजी या प्रकरणाची माहिती वरिष्ठांना दिली व भविष्यात कुठल्याही सहकाऱ्याला अडचणी येऊ नयेत, म्हणून तिने त्याच्या विरुद्ध कारवाईची मागणी केली.

काही छायाचित्रांमध्ये छेडछाड केल्याचा संशयही तक्रारदार मुलीने व्यक्त केला आहे. ह्या कंपनीत काम करणाऱ्या इतर महिलांच्या सुरक्षेचा विचार करत, ह्या कंपनीच्या भारत विभाग प्रमुखाने तात्काळ सायबर पोलीसांत तक्रार नोंदवण्याच्या सूचना दिल्यात.

चांदवड | पोलिसांची मोठी कारवाई; 50 लाखाचा गुटखा जप्त

महिलांना ब्लॅकमेलिंग केले?

पोलीसांनी सांगितले की, आरोपी संतोष विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला असून, त्याला ह्या कार्यालयातून अटक करण्यात आलेली आहे. इतके फोटो का ठेवलेत, त्याचा नेमका हेतू काय होता? हे अश्लील फोटो त्याने कुठून मिळवली याबाबत माहिती घेण्यासाठी आम्हाला आणखी वेळ हवा आहे.

दरम्यान, ह्या आरोपीच्या मोबाईलमधील काही फोटो हे छेडछाड केलेले आहेत. तर काही फोटो हे खरे आहेत. त्याचा वापर त्याने कोणत्या महिलेला ब्लॅकमेल करण्यासाठी यापूर्वी केलेला होता का? याचीही चौकशी केली जाणार आहे. त्याच्या फोनमधील चॅट हिस्ट्री तसेच फोन कॉल्सचीदेखील चौकशी सुरू आहे.

Chandwad | चांदवड येथील संतप्त पालकांनी शाळेला ठोकलं कुलूप


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here