Chhagan Bhujbal | मोदींनी दिलेल्या 10 टक्के आरक्षणात 85 टक्के मराठे; भुजबळांची आकडेवारी

0
38

Chhagan Bhujbal |   मराठा समाजाला आरक्षण नाही असं म्हणताय, त्यांनाच आरक्षणाचा सर्वाधिक फायदा झाला असून मोदींनी दिलेल्या १० टक्के आरक्षणामध्ये ८५ टक्के जागा या मराठा समाजालाच मिळाल्या असल्याचा आरोप  मंत्री छगन भुजबळ यांनी केला आहे. केंद्रीय लोकसेवेच्या IAS १५.५० टक्के आणि IPS मध्ये २८ टक्के मराठा समाजाचेच असल्याची आकडेवारीच भुजबळांनी भर सभेत मांडली.

काय म्हणाले मंत्री छगन भुजबळ? 

मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्यावर पुन्हा टीका केलेली आहे. ते म्हणाले, इतरांना दिलेल्या आरक्षणाचा सर्वाधिक फायदा हा मराठा समाजाला झालाय. मोदी सरकारने दहा टक्के आरक्षण दिलं, त्यामध्ये ८५ टक्के जागा ह्या मराठा समाजालाच मिळाल्या आहे. आमच्या २७ टक्के आरक्षणातही मराठा समाज आहेच. त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण नसतानाही सर्वाधिक फायदा मिळतोच आहे.

26 November |  संविधानाचा स्वीकार ते मुंबईवर हल्ला; आजच्या दिवशी काय घडलं..?

भुजबळांची आकडेवारी

ईडब्ल्यूएस मध्येही ७८ टक्के मराठा समाजाला आरक्षण मिळालं आहे.

मराठा समाजाला लोकसेवा आयोगात प्रतिनिधित्व
ए ग्रेड – ३३.५० टक्के
बी ग्रेड – २९ टक्के
सी ग्रेड – ३७ टक्के
डी ग्रेड – ३६ टक्के

वर्षभरात झालेल्या ६५० नियुक्त्यांपैकी ८५ टक्के नियुक्त्या ह्या मराठा समाजालाच मिळाल्या आहेत.

मराठा समाजाला आर्थिक मदतही

मराठा समाजात गरीबही आहेत, आमचा त्यांना विरोध नाहीच. पण, त्यांना आताही आरक्षणाचा लाभ मिळतच आहे. अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळाच्या माध्यमातून ७० हजार लाभार्थ्यांना ५,१६० कोटी रुपये देण्यात आले आहेत. ओबीसींनाही अद्याप तेवढे देण्यात आलेले नाही. राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती, पंजाबराव देशमुख महामंडळाच्या माध्यमातून मराठा समाजाला १०,५०० कोटी इतके पैसे दिले आहेत.

Manoj Jarange | मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; तातडीने रुग्णालयात दाखल


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here