crime news | 2 बायकांनी पूर्ण कुटुंब सपंवलं

0
24

crime news | बाईपाई काय घडेल याचा अंदाज बांधणे कठीण आहे. आजची स्री अबला नाही सबला आहे हे आपण बघितले आहे मात्र देशात गुन्हेगारीत देखील महिलांनी डोके वर काढले आहे. क्राईम पट्रोलला लाजवेल अशी भयानक स्टोरी प्रत्यक्षात घडलेली आहे. गडचिरोली येथे 20 दिवसात 5 जणांचा रहस्यमयरित्या मृत्यू झालेला आहे. विशेष म्हणजे याठिकाणी 2 महिलांनी पूर्ण कुटुंब सपंवले असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलिसांनी नुकतेच या दोघी महिलांना अटक केली आहे.

गडचिरोली जिल्ह्यातील महागाव येथील एकाच कुटुंबातील 5 जणांच्या मृत्यूचे गूढ उलगडले आहे. या महिन्यात अन्न-पाण्यात विष मिसळून पाच जणांची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे सून आणि मामीने हे दुष्कृत्य केल्याची माहिती तपासात निष्पन्न झाली आहे. चक्क 20 दिवस हा विषप्रयोग सुरु होता. यातून या पाच जणांचा बळी घेण्यात आला आहे. पोलिस तपासाअंती या दोघींनाही अटक करण्यात आली. सूरवातीला पती- पत्नी, विवाहित मुलगी, मावशी अन् शेवटी मुलगा अशा पध्दतीने 20 दिवसांत एकामागे एक अशा पाच जणांच्या रहस्यमय मृत्यूने अहेरी तालुक्यातील महागाव (बु.) हादरुन गेले. या संपूर्ण प्रकरणाचा पोलिसांनी उलगडा केला आहे. अतिशय सूक्ष्म नियोजन करून थंड डोक्याने केलेल्या हत्येचा कट पोलिसांनी मात्र पुढे आणला आहे. अन्न-पाण्यात विष मिसळून या पाचही जणांना संपविल्याचे कारण समोर आले आहे. हा सर्व प्रकार सासरच्या छळाला कंटाळून सुनेने तर संपत्तीच्या वादातून मामीने एकत्रित येत सर्व प्रकरण घडवल्याचे समोर आले आहे.

यात शंकर कुंभारे,  विजया कुंभारे, त्यांची विवाहित कन्या कोमल विनोद दहागावकर,  मावशी आनंदा उराडे व मुलगा रोशन शंकर कुंभारे, अशी मृतांची नावं आहेत. सून संघमित्रा रोशन कुंभारे आणि रोशनची मामी रोजा रामटेके या दोघींना पोलिसांनी अटक केलेली आहे.

नमेकं काय घडलं ?

शंकर कुंभारे यांचे महागाव येथे टिंबर मार्टचे दुकान होते. २२ सप्टेंबरला रात्री विजया कुंभारे यांची तब्येत बिघडली. डोकेदुखी आणि उलट्या होऊ लागल्याने पती शंकर कुंभारे  यांनी त्यांना चंद्रपूरला नेले. त्यानंतर शंकर यांची देखील प्रकृती खालावली. दोघांनाही उपचारादरम्यान नागपूरला दाखल करण्यात आले. उपचार सुरु असताना २६ तारखेला शंकर तर २७ तारखेला विजया यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना घडली तेव्हा विवाहित मुलगी कोमल दहागावकर माहेरी आली होती. प्रकृती खालावल्यामुळे चंद्रपूरला नेताना ८ ऑक्टोबरला वाटेत तिने देखील प्राण सोडले.

संघमित्रा ही मूळची अकोला येथील रहिवासी असून ती BSC AGRI च्या द्वितीय वर्षात शिकत आहे. संघमित्रा आणि रोशन हे पोस्ट खात्यात सोबत काम करायचे. तेथेच त्यांचे सूत जुळले अन डिसेंबर 2022 मध्ये त्या दाेघांनी लग्न केले. पण प्राध्यापक वडिलांना हे लग्न मान्य नव्हते. त्यांना पक्षवात झाला त्यानंतर एप्रिल २०२३ मध्ये त्यांनी आत्महत्या केली. त्यानंतर संघमित्रा व रोशन यांच्यात वाद निर्माण झाला. सासरचे लोक छळ करत असल्याने त्यांना संपविण्याचा कट शेवटी तिने रचला. रोशनची मामी रोजा रामटेके त्याच गावात राहते. रोशनला तीन मावशी असून रोजा रामटेके हिच्या पतीच्या नावे असलेल्या चार एकर जमिनीवर रोशनची आई विजया व इतर तीन बहिणींनी दावा सांगितला होता, त्यामुळे तिच्या मनातही राग होताच. यातून या दोघींनी मिळून संपूर्ण कुटुंबाला जीवे मारण्याचा धक्कादायक कट अतिशय थंड डोक्याने योजल्याची माहिती तपासात समोर आली.

विशेष म्हणजे या खुनात संघमित्रा हिने इंटरनेटवर सर्च करुन विना रंगाचे, दर्प न येणारे व हळूहळू शरीरात भिनणारे घातक द्रव परराज्यातून मागवल्याची माहिती पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी दिली. दोघी आरोपींनी नॉनव्हेज, डाळीतून तसेच पिण्याच्या पाण्यात विषारी द्रव मिसळले व ते टप्प्याटप्प्याने कुटुंबातील लोकांना दिले.  यात २० दिवसांत घरातील पाच जणांचा या विषप्रयोगात बळी गेला.

या प्रकरणात 3 जणांवर उपचार सुरू असून रोशनच्या आई- वडिलांना दवाखान्यात नेणारा खासगी वाहनचालक राकेश अनिल मडावी याच्यावर नागपूर तसेच रोशनचा मावसभाऊ बंटी उंदीरवाडे याच्यावर चंद्रपूर व रोशनचा भाऊ राहुल हा दिल्लीत उपचार घेत आहे. या सर्वांची प्रकृती स्थिर असून या संपूर्ण कटात आणखी काहींचा सहभाग असल्याने त्याविषयी पोलीस तपास करत आहेत.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here