Maharashtra | शिवसेना आमदार अपात्रेतेच्या सुनावणीदरम्यान ‘वर्षा’वर बुधवारी मोठी घडमोड घडली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यात बंद दाराआड चर्चा झाल्याची माहिती आता समोर आलेली आहे. या दोन्ही नेत्यांमधील या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आल्याचं पहायला मिळत आहे. बुधवारी विधानसभा अध्यक्ष अचानक वर्षा बंगल्यावर दाखल झालेले होते. तेथे या दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास अर्धा तास चर्चा झाल्याची माहिती आहे. या दोघांमधील चर्चा अत्यंत महत्त्वाची आणि गुप्त होती. कारण ज्यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये बैठक होती त्यावेळी सुरक्षारक्षकांपासून इतर स्टाफ या सर्वांना तिथे प्रवेश नाकारण्यात आलेला होता. त्यामुळे या दोन्ही नेत्यांमध्ये नेमकी काय चर्चा झाली, याबाबत सर्वांनाच उत्सुकता आहे.
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर भेटीनंतर बाहेर आले त्यावेळी पत्रकांरांनी त्यांना या भेटीबाबत विचारलं असता त्यावेळी त्यांनी मतदारसंघातील कामानिमित्त ही भेट असल्याचं सांगितलं. मात्र या भेटीच्या ह्या टायमिंगमुळे आता सर्वत्र चर्चा सुरु झाल्या आहेत. एकीकडे आमदार अपात्रतेची सुनावणी आहे, तर दुसरीकडे या दोन्ही नेत्यांची भेट झाली आहे. त्यामुळे सुप्रीम कोर्टाने खडेबोल सुनावल्यानंतर आता विधानसभा अध्यक्ष काय निर्णय घेतात याकडे, सर्वांचचं लक्ष आहे.
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना सुप्रीम कोर्टाने सुधारित वेळापत्रक सादर करण्यासाठी ३० ऑक्टोबरपर्यंतची वेळ दिलेली आहे. ३० ऑक्टोबर रोजी सुप्रीम कोर्टात पुन्हा सुनावणी होणार आहे. जर विधानसभा अध्यक्षांनी सादर केलेले वेळापत्रक समाधाकारक नसेल तर सुप्रीम कोर्ट याबाबत निर्णय घेणार आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यात झालेली भेट महत्त्वाची मानली जात आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम