Breaking news : नाशिकच्या ऐतिहासिक महत्वात पडणार भर ; ऐतिहासिक बोधी वृक्षाची या ठिकाणी होणार स्थापना

0
18

Breaking news : नाशिक शहराला मोठं धार्मिक महत्व लाभलं असून आता बोधीवृक्षाच्या माध्यमातून नाशिकच्या इतिहासात आणखी मोठी भर पडणार आहे.

नाशिक शहरात असलेल्या त्रिरश्मी बुद्ध लेणी येथील बुद्धस्माकराच्या परिसरामध्ये ऑक्टोबर २०२३ मध्ये श्रीलंकेतील अनुराधापुर येथील बोधीवृक्षाच्या फांदीचे रोपण केल जाणार आहे. या बोधीवृक्ष स्थापना महोत्सवासाठी देशभरातून उपासक(upasak) येणार असल्याने त्यांना आवश्यक असणाऱ्या सोयी-सुविधांचे सुत्रबद्ध नियोजन करण्यात यावे यासंदर्भात सूचना राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी त्रिरश्मी बुद्ध लेणी(buddha caves) बोधीवृक्ष स्थापनेचे नियोजित स्थळ व सभा ठिकाण यांची पाहणी केली.

इ.स.पूर्व २५६६ वर्षांपूवी सिद्धार्थ गौतम बुद्ध यांना निरंजना नदीच्या काठावार बोधी वृक्षाखाली ज्ञान प्राप्त झाले. त्यामुळे हे बोधीवृक्ष अतिपूजनीय आहे. सम्राट अशोक यांच्या मुलांनी या बोधीवृक्षाची फांदी श्रीलंकेच्या देवानामप्रिय तिरस यांच्या हस्ते अनुराधापूर येथे स्थापित केली. आणि आता याच बोधीवृक्षाच्या फांदीचे रोपण नाशिक शहरात देखील करण्यात येणार असल्याने शहराच्या ऐतिहासिक महत्वात भर पडणार असल्याची माहिती शांतिदूत चॅरिटेबल ट्रस्टचे मुख्य संयोजक भदन्त सुगत यांनी यावेळी दिली.

https://thepointnow.in/satana-riots-take-a-political-turn/

दरम्यान यावेळी जिल्हाधिकारी जलज शर्मा, पोलीस आयुक्त अकुंश शिंदे, पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी, शहर अभियंता एस. आर. वंजारी, शांतिदूत चॅरिटेबल ट्रस्टचे मुख्य संयोजक भदन्त सुगत, माजी खासदार समीर भुजबळ यांच्यासह महानगरपालिकेचे अधिकारी उपस्थित होते.

काय आहे बोधी वृक्षाचे महत्व 

समस्त बौद्धांची प्रेरणाभूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दीक्षाभूमी (dikshabhumi) मध्ये डौलाने उभा तो बोधिवृक्ष हा साधासुधा पिंपळाचा वृक्ष नाहीये तर या बोधिवृक्षाखाली सिद्धार्थ गौतमाला बुद्धत्व प्राप्त झाले, त्या कुटुंबातील हा वारसा आहे. त्यामुळे या बोधिवृक्षाला अनन्यसाधारण महत्त्व असून बुद्धगयेतील बोधिवृक्षाचा वारसा असलेला हा बोधिवृक्ष सम्राट अशोका सोबतसुद्धा संबंधित आहे. दीक्षाभूमीत मात्र तो श्रीलंकामार्गे (shri Lanka) पोहोचला हे विशेष आहे.

तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध यांनी धम्मचक्र प्रवर्तन करून भारताला बुद्ध धम्म दिला. पुढे सम्राट (samrat ashok) अशोकाने तथागत बुद्धांचा धम्म देशविदेशात पोहोचवला. संघमित्रा आणि महेंद्र या आपल्या मुलांना बौद्ध धम्माचा प्रचार-प्रसारासाठी त्यांनी श्रीलंकेमध्ये पाठवले.

दरम्यान श्रीलंकेला प्रचारासाठी जात असताना संघमित्रा आणि महेंद्र यांनी बुद्धगयेतील मूळ बोधिवृक्षाची फांदी सोबत नेली. या फांदीचे त्यांनी श्रीलंकेतील अनुराधापूर येथे मोठ्या श्रद्धापूर्वक रोपण केलं व श्रीलंका सरकारने या बोधिवृक्षाला राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित केल. बोधिवृक्षाभोवती कंपाऊंड(compound) आणि वर सोन्याचा कळस देखील चढवण्यात आला आहे.

पुढे भदंत कौसल्यायन हे बौद्ध धम्माचे गाढे अभ्यासक व विचारवंत म्हणून जगभर विख्यात झाले. दीक्षाभूमीशी त्यांच नात दृढ झाल्यानंतर त्यांनी हा बोधिवृक्ष दीक्षाभूमीवर आणण्याचा मोठा त्यांनी निर्णय घेतला. यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर(dr. B.R. Ambedkar) स्मारक समितीचे तत्कालीन अध्यक्ष दादासाहेब गायकवाड व कार्यवाह सदानंद फुलझेले यांची मदत लाभली. भदंत कौसल्यायन यांच्या विनंतीवरून श्रीलंका सरकारने संसदेत ठराव पारित केला आणि १९६८ साली या बोधिवृक्षाच्या फांदीला भारतात आणण्याची परवानगी मिळाली. तीन वेगवेगळे कोवळे बोधिवृक्ष कुंडीत ठेवण्यात आले व नंतर विमानाने त्यांना भारतात आणण्यात आले.

१२ मे १९६८ साली दीक्षाभूमीवर समारंभपूर्वक त्याचे रोपण झाले. समारंभाच्या अध्यक्षस्थानी दादासाहेब गायकवाड होते. एकाच ठिकाणी या तिन्ही वृक्षांना आदरपूर्वक स्थान देण्यात आले. ते एकमेकांमध्ये मिसळून असे वाढले की, बघणाऱ्यांना तो एकच वृक्ष वाटावा. या पद्धतीने तथागतांच्या बुद्धत्वाचा वारसा जपणाऱ्या बुद्धगयेतील बोधिवृक्षाला(bodhi vruksh) दीक्षाभूमीवर पोहोचण्यासाठी श्रीलंकेचा मार्ग अवलंबावा लागला.

दरम्यान इतका मोठा ऐतिहासिक(historical Nashik) वारसा लाभलेला बोधीवृक्षाचा नाशिकमध्ये देखील स्थापन केला जाणार आहे यामुळे नाशिकच्या ऐतिहासिक महत्त्वामध्ये आणखी एक मैलाचा दगड स्थापन होणार आहे.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here