Nashik : नाशिकमधील पर्यटन स्थळांवर टवाळखोरांचा उपद्रव ; पहिने भागात किरकोळ कारणातून हाणामारी


Nashik : निसर्गाच अलौकिक वरदान लाभलेल्या नाशिक जिल्ह्यात पावसाळ्यामुळे पर्यटकांची गर्दी खूप वाढली आहे. यातच आता किरकोळ त्र्यंबक – घोटी रोडवर असलेल्या पहिणे घाट परिसरात किरकोळ कारणातून वाद होऊन हणामारीची घटना समोर आली आहे.

नाशिक जिल्हा हा आपल्या निसर्ग सौंदर्यासाठी प्रसिध्द आहे. पावसाळ्याला सुरुवात झाली की, नाशिकच्या अंजंनेरी, ब्रह्मगिरी पर्वत रांगांवरून कोसणारे धबधबे प्रेक्षकांचे मन मोहून घेत असतात. त्यामुळे हे पावसाळा सुरु झाला की असंख्य पर्यटकांची पावले आपोआपच इकडे वळत असतात. यात विकेंडला तर पर्यटकांच्या गर्दीचा उच्चांक बघायला मिळतो. नाशिकच्या(nashik) पहिने भागात असलेल्या नेकलेस धबधब्याजवळ पर्यटकांमध्ये हाणामारीचीही घटना घडली आहे. पोलिसांचा पुरेसा बंदोबस्त नसल्याने पर्यटकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

https://thepointnow.in/the-historical-importance-of-nashik-will-increase/

डोंगरमाथ्यावरुन कोसळणारे धबधबे, खळखळ वाहणार्‍या नद्या नाले, डोंगररांगांनी पांघरलेला हिरवा शालु, ढगांच्या खिडकीतुन डोकावणारी सुर्यकिरणे, जणु काही स्वर्गभुमीची अनुभुती देणार्‍या देवभुमी त्र्यंबकेश्वर(trambkeshwar) परिसरात विविध निसर्गरम्य ठिकाणी भाविकांसह पर्यटकांनी मोठी गर्दी केली होती.

रविवारी सकाळपासुनच या ठिकाणी पर्यटकांची गर्दि वाढु लागली होती. पहिणे परिसरात शेकडो चारचाकी, दुचाकींची गर्दी झाली होती. पेगलवाडी फाट्यावर त्र्यंबक पोलीसांनी तर पहिणे बारीत वाडीवर्‍हे पोलीसांनी बंदोबस्त लावल्यामुळे ट्रॅफीक जॅम झाली नाही. वाडीवर्‍हे पोलीसांनी वाहनांची तपासणी करीत दारुच्या बाटल्या पकडल्या व पर्यटकांनाच दारु ओतुन देण्यास भाग पाडले. यात किरकोळ कारणातून वाद होऊन नेकलेस धबधब्याजवळ(water fall) पर्यटकांमध्ये हाणामारीचीही घटना घडली आहे. तर यावेळी पोलीस तपासणी मध्ये काही टवाळखोरांकडे लोखंडी राॅड, गुप्ती सारखे हत्यारंही आढळून आल्याच समोर आलं आहे.

https://thepointnow.in/the-historical-importance-of-nashik-will-increase/

त्र्यंबकेश्वर पो. स्टे. चे पो.नि. बिपीन शेवाळे यांचे मार्गदर्शनाखाली पो.ऊ.नि. जगताप, पो.ह. रुपेशकुमार मुळाणे व सहकार्‍यांनी तर वाडीवर्‍हे पो.स्टे. चे पो. नि. समीर बारवकर यांचे मार्गदर्शनाखाली पो.ह. मांडवदे, निलेश मराठे, बोराडे, विक्रम काकड, निंबेकर, होमगार्ड शहाणे, जिल्हा वाहतुक शाखेचे खैरे आदींनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

नाशिकला निसर्गाचं वरदान लाभलेलं असल्यामुळे पावसाळ्यामध्ये नाशिकचे सौंदर्य(beauty of nashik) हे द्विगुणित होत असतं. या निसर्ग सौंदर्याचा आनंद लुटण्यासाठी आणि हे मनमोहक दृश्य (nashik tourist) आपल्या डोळ्यांमध्ये साठवण्यासाठी नाशिक जिल्ह्यासह महाराष्ट्रातील विविध ठिकाणाहून तसेच महाराष्ट्र बाहेरून देखील शेकडो पर्यटक(tourist)  दररोजच नाशिकला येत असतात. मात्र यामध्ये मध्य प्राशन करून काही टवाळखोरांकडून हुल्लडबाजी केली जात असल्यामुळे पर्यटकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. यामुळे अशा पर्यटन स्थळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी संबंधित प्रशासनाने लक्ष देऊन उपाययोजना करण्याची मागणी केली जात आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Leave a Comment

Don`t copy text!