ताईची अब्रू वाचवताना अल्पवयीन भावाकडून खून, बहिणीच्या डायरीने ३ वर्षांनी उकललं गूढ

0
17

भोपाळ : तीन वर्षांपूर्वी झालेल्या अल्पवयीन मुलाच्या हत्याकांडाचे गूढ उकलण्यात पोलिसांना यश आले आहे. १४ वर्षांच्या बालिकेने लिहिलेल्या डायरीमुळे या हत्येचे गुपित उलगडले. मध्य प्रदेशातील रेवा येथे २०१९ मध्ये एका अल्पवयीन बालकाचा मृतदेह झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला होता. त्याने आत्महत्या केल्याचं भासवण्यात आलं होतं. मात्र प्रत्यक्षात, बहिणीसोबत लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न केल्याचं पाहून तिच्या भावानेच त्या मुलाची हत्या केल्याचं आता उघडकीस आलं आहे. खुद्द बहिणीनेच आपल्या दादाने हा खून केल्याचं पोलिसांना सांगितलं. अल्पवयीन मुलीच्या जबाबानुसार पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले. भावाने रचलेल्या बनावामुळे तीन वर्ष पोलिसांची दिशाभूल झाली होती.

२ डिसेंबर २०१९ रोजी ही घटना घडली होती. रेवामध्ये एक अल्पवयीन मुलगा झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला होता. मात्र पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये मुलाची गळा आवळून हत्या झाल्याचं स्पष्ट झालं होतं. पोलिसांनी तक्रार दाखल करुन या प्रकरणाचा तपास सुरु केला. गेल्या तीन वर्षांपासून पोलीस या प्रकरणाचा तपास करत होते. मात्र त्यांना कुठलेही धागेदोरे सापडत नव्हते.

दरम्यान, घटनेच्या वेळी अवघ्या ११ वर्षांच्या असलेल्या मुलीची डायरी पोलिसांना तपासाच्या दरम्यान सापडली. पोलिसांनी ही डायरी पहिल्या पानापासून अखेरपर्यंत वाचून काढली आणि तेही चक्रावून गेले. कारण ज्या हत्या प्रकरणाचे गूढ उकलण्यासाठी पोलीस जंगजंग पछाडत होते, अनेक ठिकाणं पिंजून काढत होते, त्या हत्याकांडाचे गूढ त्यांना डायरीत उलगडले.

मुलीने डायरीत त्या दिवसाचा घटनाक्रम संपूर्णपणे कथित केला होता. घटनेच्या दिवशी ती आपल्या घरात टीव्ही पाहत बसली होती. त्यावेळी गावातील एक अल्पवयीन मुलगा तिच्या घरी आला. आजूबाजूला कोणी नसल्याचं पाहून तो तिची छेड काढू लागला. त्यानंतर त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here